सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : प्रतिनिधी
वाई येथे मागील आठवड्यात न्यायालयातच झालेल्या गोळीबारात प्रकरणातील मुख्य आरोपी राजेश नवघणे याला गुन्हयात मदत करणारे आणखी दोघे संशयीतास वाई पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्यांचेकडून दोन पिस्टलसह जिवंत काडतुसं हस्तगत केली आहेत.
सुसंस्कृत शहर असलेल्या वाई शहरातील न्यायालयात कुख्यात गुंड अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव तसेच निखिल व अभिजित शिवाजी मोरे यांच्यावरील खंडणीच्या गुन्ह्याच्या खटल्याची सुनावणी दि. ७ ऑगस्ट रोजी होती. या दरम्यान, या घटनेतील फिर्यादी राजेश नवघणे (रा. मेणवली, ता. वाई) यांने न्यायालयाच्या परिसरात या आरोपींवर फायर केला होता .
या घटनेमुळे न्यायालयात परिसरात खळबळ उडाली होती व भीतीचे वातावरणही निर्माण झाले होते. यावेळेस फिर्यादी राजेश चंद्रकांत नवघणे रा. मेणवली, ता. वाई याने फाईल मध्ये लपवुन आणलेल्या पिस्टल मधुन वरील आरोपींच्या दिशेने दोन काडतुसे फायर करताना, तेथे बंदोबस्तासाठी असलेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी समयसुचकता दाखवुन, राजेश चंद्रकांत नवघणे रा. मेणवली, ता. वाई याचे हातातील पिस्टलची दिशा बदलुन चार जिवंत काडतुसासह पिस्टल व राजेश चंद्रकांत नवघणे रा. मेणवली, ता. वाई यास ताब्यात घेतले होते.
सदर गुन्हयाचा तांत्रिक विश्लेषण करून तपास करीत असताना आरोपी राजेश नवघणे याने त्याचे साथीदार शरदराव रविंद्र पवार रा. बावधन नाका, वाई, ता. वाई, व विजय लक्ष्मण अंकोशी रा. काशीकापडी झोपडपट्टी, वाई, ता. वाई, यांनी मिळुन केला असल्याचे व गुन्हा करण्याकामी मध्यप्रदेश येथुन तिन पिष्टल व १२ जिवंत काडतुसे आणुन त्यांनी रायरेश्वरच्या डोंगरा मध्ये ४ जिवंत काडतुसे झाडुन फायरींगचा सराव केला असल्याचे आरोपींनी कबुल केल्याने यातील शरदराव रविंद्र पवार यास वाई मधुन ताब्यात घेण्यात आले व त्याचेकडे तपास करता त्याने १ पिष्टल, २ जिवंत काडतुसे, तसेच विजय लक्ष्मण अंकोशी यास भिवंडी येथुन ताब्यात घेण्यात आले व त्याचेकडे तपास करता त्याने १ पिस्टल काढुन दिली आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक समिर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापु बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी परि सहा.पोलीस अधीक्षक कमलेश मीना , पोलीस उप निरीक्षक सुधिर वाळुंज, बिपीन चव्हाण, पोलीस अंमलदार पो.हवा. शिर्के, भोईर, पो. कॉ. मंगेश जाधव, पो. कॉ. श्रावण राठोड, पो.कॉ. हेमंत शिंदे, पो. कॉ. प्रसाद दुदुस्कर, पो. कॉ. प्रेमजित शिर्के, पो.कॉ.राम कोळी, पो. कॉ. गोरख दाभाडे यांनी केली.