सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : ओंकार साखरे
जावली तालुका दारूमुक्त होऊन १५ ते १६ वर्षे झाली. तालुका दारूमुक्त होवुन काय फरक पडला तो आहे हे आपणा सर्वांना माहित आहे. त्यामुळे आता आम्हाला दारू दुकाने पाच वर्षे सुरु करू द्या. जर काही फरक वाटला नाही तर परत निर्णय घेवू असे सांगताना एका दारूवाल्याकडून ७० हजाराचा हप्ता जातो तर शासनाचा महसूल बुडून लाखो रुपये हप्त्यात जातात असा आरोप माजी सभापती सौभर शिंदे यांनी केला.
मेढा येथिल भैरवनाथ मंदिरात शासनमान्य दारू दुकाने सुरु करण्यासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष पांडूरग जवळ, माजी उपनगराध्यक्ष दत्ता आण्णा पवार मेढेकर, माजी उपसभापती कांतीभाई देशमुख, रविंद्र परामणे, माजी जिप सदस्य मच्छिंद्र क्षिरसागर, आरपीआय जिल्हाध्यक्ष संजय गाडे, संदिप परामणे, माजी नगरसेवक विकास देशपांडे, शशिकांत गुरव, शिवाजीराव देशमुख, तुकाराम धनावडे आदी पंचक्रोशीतील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सौरभ शिंदे यांनी दारू बंदीमुळे बाजारापेठांचे नुकसान झालेचे सांगुन विद्यार्थी पिशवीतुन दारू आणून विक्री करू लागला आहे हे सांगतांना झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग म्हणून अवैध धंद्यांकडे पाहीले जात असल्याचे शिंदे म्हणाले. यावेळी त्यांनी विलास जवळांचे नाव न घेता आम्ही सोन्याचे चमचे तोंडात घेऊन आलो म्हणजे आमचे बापजादांनी करून ठेवले असल्याचे सांगीतले.
यावेळी माजी नगराध्यक्ष यांनी जावली तालुका दारूमुक्त झाला म्हणून जिल्हयात नव्हे तर महाराष्ट्रात नाव झाले. सर्वांना आनंद झाला पण त्याचे श्रेय फक्त व्यसन मुक्तीवाल्यानी घेतले. हार तुर्याला पुढे पुढे केले. प्रसिद्धी मिळविण्याशिवाय काही केले नाही अशी टिका करीत आम्ही सर्वांनी प्रयत्न केले म्हणून दारूमुक्त तालुका झाला परंतु आमच्या नावाचा उल्लेख सुद्धा कधी करण्यात आला नाही असेही सांगीतले.
माजी उपसभापती कांतीभाई देशमुख यांनी तालुक्यातील दारु बंद करून आम्ही मोठे पाप केले असल्याचे सांगुन अवैद्य दारु बंद करून शासन मान्य दारु दुकाने सुरु करण्यासाठी संघटीत होण्याचे आवाहन केले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष दत्ता आण्णा पवार मेढेकर यांनी तंटामुक्त अध्यक्ष असताना ठराव करून तो ग्रामसभेला दिला आणि ग्रामसभेने तो पुढे पाठवून मेढ्यातील दारू दुकाने बंद केली. त्याचे श्रेय इतरांनी घेतले असे सांगुन मी जो त्यावेळी निर्णय घेतला होता तो चुकीचा झाला आज तरुण मुले दारुचा व्यवसाय करु लागली आहेत तर जेष्ठ नागरिक मोफत प्रवास असल्याने बाहेरू आणायला जाताना दिसताहेत असे सांगीतले. ते पुढे म्हणाले दारु बंद करून मी बाजार पेठ संपविल्याची जाणीव होते आहे. मी दारू दुकाने बंद केल्यावर माझ्या घरावर लोक मोर्चा आणतील अस वाटतं होत आणि मी त्याची वाट पहात होतो पण तस झाल नाही परंतु आता ती चुक सुधारुन आपण सर्वांनी निर्णय घेऊन पुन्हा शासनमान्य दारू सुरु करण्याचा निर्णय घेवु असे सांगीतले.
यावेळी रवि परामणे, विकास देशपांडे, शिवाजीराव देशमुख, संजय गाडे, सचिन जवळ, मच्छिद्र क्षिरसागर, नारायण शिंगटे आदीनी दारू बंद केल्याने झालेले तोटे सांगुन एकजुट दाखवून पुन्हा शासनमान्य दारू दुकाने सुरु करण्याचा निर्णय जाहीर केला. यावेळी शासनमान्य दारू दुकान सुरु करण्यासंदर्भातील करण्यात आलेला ठराव माजी नगर सेवक शशिकांत गुरव यांनी वाचुन दाखविला. या ठरावाला सुचक माजी नगराध्यक्ष पांडूरंग जवळ व अनुमोदन माजी उपनगराध्यक्ष दत्ता आण्णा पवार मेढेकर यांनी मान्यता दिली. यावेळी उपस्थितांनी हात वर करून ठरावाला मान्यता दिली.