सातारा जिल्हा मंडप लाईट फ्लॉवर डेकोरेशन असोसिएन अध्यक्षपदी संदिप गोळे व उपाध्यक्षपदी श्रीकांत हगवणे यांची बिनविरोध निवड

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टिम------
जावली प्रतिनिधी (धनंजय गोरे)
प्राचीन काळापासूनच लग्नाच्या मांडवातच लग्नसोहळा पार पडतो.लग्नसोहळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास गोष्ट असते.फक्त वर आणि वधूसाठी नाही तर त्यांच्या कुटुंबासाठीदेखील हा सोहळा एक अविस्मरणीय क्षण असतो.महाराष्ट्र राज्य टेंट वेलफेअर असोसिएन संचालक गोरखनाथ बापू करपे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा मंडप लाईट फ्लॉवर डेकोरेशन व्यावसायिक असोसिएन यांचे वतीने सातारा जिल्हाअध्यक्ष पदी संदिप गोळे यांची व उपाध्यक्ष पदी श्रीकांत हगवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
    कराड येथील उत्सव लोन्स येथे सातारा जिल्हा मंडप लाईट फ्लॉवर डेकोरेशन व्यावसायिक असोसिएनच्या  व कराड तालुका यांच्या वतीने बैठीकेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी गोरखनाथ बापू करपे यांच्या हस्ते सातारा जिल्हा अध्यक्ष पदी संदिप गोळे यांचा व उपाध्यक्ष पदी श्रीकांत हगवणे यांचा महादेव सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार  करण्यात आला.तसेच जिल्हा सचिव पदी रमेश साळुंखे,खजिनदार पदी राजेश भोसले व सातारा जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून रघुनाथ यादव,फैय्याज मुलाणी यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

सातारा जिल्ह्यात राजकीय पक्षाचे,असो किंवा शासकीय कार्यक्रम असो जिल्ह्यातील मंडप व्यावसायिकांचा नक्कीच हातभार असतो पण आज जिल्ह्याच्या ठिकाणी मंडप व्यावसायिकांचा समतोल साधण्यासाठी हक्काचे ठिकाणी नाही यासाठी सातारा जिल्ह्याचे सुपुत्र व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य टेंट वेलफेअर असोसिएनचे संचालक गोरखनाथ बापू करपे यांनी जागेच्या उपलब्धते साठी  सर्वतोपरी प्रयत्न करून हा प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात सर्वतोपरी प्रयत्न करणारअसल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.व मंडप व्यवसायासाठी  येणाऱ्या अडचणी साठी विविध विषयांवर चर्चा व मार्गदर्शनही केले. 

     या बैठकीस मा.अध्यक्ष रामभाऊ हादगे,मा.उपाध्यक्ष महेश सोनावणे,मा.उपाध्यक्ष प्रविण कट्टे पाटील,ज्येष्ठ व्यावसायिक रघुनाथ यादव,अमोल शहा,आतार भाई राजेंद्र लोखंडे,सातारा  जिल्हा मंडप लाईट फ्लॉवर डेकोरेशन व्यावसायिक असोसिएनचे संचालक सर्व तालुका अध्यक्ष विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
           नुतन अध्यक्ष संदिप गोळे यांनी जिल्ह्यातील संचालक व सभासद यांना मार्गदर्शन केले,तसेच  सर्व तालुक्यातील नूतन पदाधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आले.या कार्यक्रमाची प्रस्ताविकाता जिल्हा संचालक हरिभाऊ साळुंखे यांनी केली. जिल्हा संचालक जगन्नाथ बडे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले व जिल्हा संचालक राजू तपासे यांनी सर्वांचेआभार मानले.
To Top