सोमेश्वर रिपोर्टर टीम---
सुपे : प्रतिनिधी
बारामतीचे उपविभागिय अधिकारी तसेच उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यालयाची कोणतीही परानगी नसताना बेकायदेशीर बैलगाडा शर्यत
भरवल्याप्रकरणी सुपे येथील एकावर वडगाव निंबाळकर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस कॉन्स्टेबल सचिन अंकुश दरेकर वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन अंतर्गत सुपा दुरक्षेत्र ता. बारामती जि. पुणे. यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अजित विश्वनाथ खैरे रा खैरेपडळ ता. बारामती जि.पुणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर हकीकत अशी दि २ रोजी दुपारी २ वाजता सुपे गावचे हददीतील जमिन गट नं 253 मध्ये मोकळे जागेत बैलगाडी शर्यत भरवण्यात आली होती. मात्र खैरे यांनी उपविभागिय अधिकारी तथा उपविभागीय दंडाअधिकारी बारामती यांचे कार्यालयाची कोणतीही पराणगी नसताना बेकायदेशीर बैलगाडा शर्यत घेतल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS