आधी ते चारचाकी गाड्या चोरायचे...मंग त्या गाडीची बनावट कागदपत्रे बनवून गाड्या मोठ्या किंमतीला विकायचे : पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
कराड : प्रतिनिधी
कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने चोरी केलेल्या चारचाकी गाड्या विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.

कराड शहर पोलीस ठाण्यात स्वीफ्ट गाडीची चोरी करुन तीचे बनावट कागदपत्रे बनवुन गाडीची विक्री केल्याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला होता. नमुद गुन्हयातील आरोपी हे कोल्हापुर व कराड मधील असल्याची गोपनीय माहिती पोलीस उप निरीक्षक आर. एल. डांगे यांना त्यांचे गोपनिय बातमीदार मार्फत प्राप्त झाली होती. सदर माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक कोल्हापुर व दुसरे पथक कराड तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत रवाना झाले. तांत्रिक माहितीच्या आधारे रात्री उशिरा आरोपींना कोल्हापुर व बेलवडे हवेली ता. कराड मधुन ताब्यात घेतले. तपासादरम्यान आरोपींकडून एक मारुती सुझूकीची स्विफ्ट आणि टोयोटा कंपनीची इनोव्हा क्रिस्टा अशा एकुन वीस लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींकडे अधिक तपास करता सदर आरोपींविरूध्द गाडीची चोरी करुन तीचे बनावट कागदपत्रे बनवुन गाडीची विक्री केल्याबाबत इतर पोलीस ठाण्यात देखील गुन्हे नोंद असल्याचे निष्पन्न झाले आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापु बागंर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कराड अमोल ठाकुर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विभुते, पोलीस उप निरिक्षक आर.एल.डांगे, सफौ देसाई, पोलीस नाईक संतोष पाडळे, पो.शि. महेश शिंदे, आनंदा जाधव, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, संपोष लोहार, सोनाली पिसाळ यांनी केली .
To Top