सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : विजय लकडे.
पुरंदर तालुक्यातील एक मोठी बाजारपेठ असलेली निरा बाजारपेठेत मराठी व्यतिरिक्त राज्याबाहेरील अनेक भाषा कानावर पडायला लागलेल्या आहेत.
नीरा बाजारपेठ आजूबाजूच्या दहा किलोमीटरच्या परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ असून इथे रोजगाराच्या नावाखाली जे परप्रांतीय वास्तव्यास आहेत ते भारतातील परप्रांतीय आहेत ते कोणत्या राज्यातून आलेले आहेत याबाबत कोणाला काहीही माहिती नाही व कोणी गांभीर्याने ही घेत नाही.
गुन्हेगारी प्रवृत्तीचे हे परप्रांतीय त्यांच्या परिसरात गुन्हे करून आपले अस्तित्व लपवून रोजगाराच्या नावाखाली महाराष्ट्रात जागोजागी वास्तव्य करीत आहेत. परप्रांतीयांच्यामुळे आपल्या परिसरातही गुन्हेगारीत वाढ झालेली आपणास दिसत आहे . परप्रांतीयाकडून गुन्हा घडल्यानंतर त्यांना शोधणे पोलिसांनाही कठीण जात आहे.परप्रांतीय ज्या ठिकाणी वास्तव्य करीत आहेत तसेच ज्या ठिकाणी भाडोत्री म्हणून राहत आहेत त्या मालकांनी याबाबत पोलिसांना लेखी माहिती देणे बंधनकारक असूनही गांभीर्याने या भाडेकरूंची माहिती दिली जात नाही.
अनेक परप्रांतीय नंबर नसलेल्या आणि चासी व इंजिन नंबर खोडलेल्या टू व्हीलर वापरताना दिसून येत आहेत. अशा गाड्यांचा अपघात झाल्यास यांना त्याचे काही घेणे देणे नसते. कधीकधी तर अशा गाड्या सोडून ते पळून जात असतात. अशी वाहने चोरीची आहेत का मालकी हक्काचे आहेत याबाबत कोणतीही तपासणी केली जात नाही.
परप्रांतीयाकडून महिला व मुली पळवणे तसेच महिला अत्याचारांच्या गुन्ह्याच्या प्रमाणात मोठी वाढ झालेली दिसत आहे.
जुबिलियन्ट इन ग्रेव्हीया कंपनीमध्ये कंत्राटी कामावरील परप्रांतीयांना व कंपनीत येणाऱ्या वाहन चालकांना पोलिसांचे व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट आवश्यक असतानाही त्याची कोणीही चौकशी करीत नाही. अनेक स्थानिक लोक व प्रशासकीय यंत्रणा आमिषापोटी अशा अस्तित्व लपवून राहणाऱ्या परप्रांतीयांना स्थानिक सुविधा व आवश्यक आधार कार्ड व पॅन कार्ड मिळवून देत असतात. एकंदरीतच नीरा बाजारपेठेच्या सुरक्षेचा बोजवारा उडालेला दिसत आहे. असे मत निरेतील जेष्ठ ग्रामस्थांनी 'सोमेश्वर रिपोर्टर'च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.