सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील सुकलवाडीतील बिबट्याची घटना ताजी असतानाच आता बारामती तालुक्यातील सोमेश्वर कारखाना नजीक वाघळवाडी-मळशी रस्त्यावरील नीरा डाव्या कालव्याच्या भरावावर बिबट्याचे दर्शन झाले असून बिबट्या मोबाईल कॅमेरात कैद झाला आहे. तो बिबट्याच असल्याचे प्रथमदर्शनी पहाणाऱ्यांनी सांगितले.
सायंकाळी साडेपाच वाजता राहुल जगताप व केतन जगताप हे नीरा डाव्या कलव्यावरून घरी जात असताना त्यांना बिबट्या निदर्शनास पडला. त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये याचे चित्रीकरण केले आहे.