बारामती ! विद्या प्रतिष्ठानच्या तनुष्का भुजबळचे कुस्ती स्पर्धेत यश : जिल्हा पातळीवर निवड

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर ! प्रतिनिधी
विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल सी.बी.एस.ई वाघळवाडी येथील इयत्ता सातवी इयत्ता मध्ये शिकणारी विद्यार्थिनी तनुष्का भुजबळ हिने १४ वर्षाखालील ४५ वजन गटातील कुस्ती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाने विजयी होऊन जिल्हा पातळीवरील कुस्ती स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले.
सदर स्पर्धेचे आयोजन २८ ऑगस्ट २०२३ रोजी बारामती कुस्तीगीर संघ, बारामती येथे आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये बारामती परिसरातील अनेक शाळांनी सहभाग नोंदवला होता. तनुष्काने केवळ दोन फेऱ्यामध्येच हे यश संपादन केले. शाळेतील क्रीडा शिक्षक उर्मिला मचाले व रणजित देशमुख यांचे बहुमूल्य मार्गदर्शन तनिष्काला वारंवार मिळत असते.
तिच्या या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य सचिन पाठक यांनी अभिनंदन केले. 
To Top