महाबळेश्वर ! ओंकार साखरे ! घोणसपूर गाव स्वातंत्र्यानंतर ही रस्त्याविना पारतंत्र्यात... दवाखान्यात जाण्यासाठी करावी लागते पाच किमी ची पायपीट : लोकप्रनिधींचे दुर्लक्ष, वनविभाग सुस्त

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
मेढा - ओंकार साखरे
जावली महाबळेश्वरचे सुपुत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे झाल्याने तालुक्यातील जनतेच्या अपेक्षा वाढल्या असताना महाबळेश्वर तालुक्यातील घोणसपूर गाव स्वातंत्र्यानंतर रस्त्यासाठी झगडताना दिसत असून तेथिल जनतेची पारतंत्र्यात असल्याची भावना झाली आहे. 
        येथिल जनतेची रस्त्याची मागणी अनेक वर्षांपासून असताना वन विभाग सुस्त असल्याने आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याने घोणसपूरच्या जनतेची जिवनयात्रा संघर्षमय झाली असल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुलदीप यादव व किरण जंगम यांनी मांडले आहे.
             घोणसपूर येथिल लोक जंगलाचे संरक्षण करीत येथे वास्तव्यास आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून घोणसपूर गाव संघर्षमय जिवन जगत आहे. गावामध्ये आजारी व्यक्तीला उपचार करावयाचा म्हटले तर चार पाच किलोमिटरचे अंतर जंगलातुन पायी चालत डालग्यातुन घेवून जावे लागत आहे. पिढयान पिढ्या येथे राहत असलेल्या जनतेला रस्त्याविना मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. 
              वन विभागाच्या कचाट्यात सापडलेल्या येथिल जनतेच्या मदतीला कोणीच धावून येत नाहीत असा आरोप येथिल जनतेचा आहे. मुख्यमंत्र्यांच्या जन्मभुमित आजही रस्त्याच्या मागणीसाठी भिक मागावी लागत आहे अशी भावना जनतेची झाली असल्याचे डॉ. यादव यांना वाटते आहे.
               दुधगाव सोसायटी येथिल मध्यवर्ती ठिकाणी आरोग्य उपकेंद्र फाईल स्थलांतरच्या परवानगीसाठीची फाईल सरकारी उदासीनतेमुळे मंत्रालयात धुळ खात पडली आहे. अतिवृष्टीमध्ये आंबेनळी ते पोलादपूर घाट बंद पडत असल्या कारणाने ग्रामस्थांना चार साडेचार तासाचा पायी प्रवास करावा लागत आहे. महाबळेश्वरला जाण्यासाठी म्हणून पर्यायी मांघर ते दुधगाव रस्ता व्हावा ही अपेक्षा स्थानिक पंचक्रोशी आणि ४० गावातील ग्रामस्थ गेल्या २० वर्षापासून करतायेत परंतु त्याकडे कोणालाही लक्ष देण्यास वेळ नाही.
             महाबळेश्वर तालुक्यातील घोणसपूर गाव हे मधुमकरंद गड याच्या पायथ्याशी असून इर्शाळवाडी सारखी दुर्दैवी घटणा घडल्यास मदत कार्यात रस्त्याविना तातडीची मदत मिळण्यास विलंब होऊन येथिल जनतेला आपले जिव गमविण्याची वेळ फक्त सरकार व लोकप्रतिनिधी यांच्या उदासनेमुळे निर्माण होणार आहे.
            घोणसपूर आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ अजूनही आदिवासीचेच जिवन जगण जगत आहेत. आज भारत विश्वगुरु बनन्याच्या गोष्टी वाचतो पण आम्हाला या अतिवृष्टीत जवळचा दवाखाना आणि रस्त्याच्या आभावी डालग्यातुन पेशन्ट टाकून महाबळेश्वर पर्यत पायी न्यावे लागत असेल तर मग आमच्या सारखे दुर्दैवी कोण असेल असा प्रश्न पडतो असे किरण जंगम यांचे म्हणणे असून मांघर ते दुधगाव रस्ता तरी व्हावा अशी मागणी केली आहे. 
               घोणसपूर गावातील श्रीमती. कुसुम संभाजी जंगम वय ६५ लकवा (पॅरलिसीस) ने आजारी रुग्णासाठी दवाखान्यात आणण्यासाठी किमान 12 किलोमीटरचा महाबळेश्वरपर्यत भरपावसात चार तास प्रवास पायी करावा लागत असल्याने येथिल जनतेच्या मनात शासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
To Top