सोमेश्वर रिपोर्टर टीम---
मेढा - ओंकार साखरे
मेढा ता. जावली येथिल श्री वेण्णा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज या विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना महसूल सप्ताहानिमित्त प्रांताधिकारी दादासाहेब दराडे यांच्या हस्ते आणि तहसिलदार हणमंत कोळेकर यांच्या उपस्थितीत विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास मंडळ अधिकारी संतोष मुळीक, तलाठी सावंत तहसील कार्यालयातील सुनील पंडित, विमल सपकाळ, ऋतुजा मोरे आदी उपस्थित होते. यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब दराडे यांनी विद्यार्थ्याना स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शन केले. तहसिलदार हणमंत कोळेकर यांनी विद्यार्थ्याना अभ्यास करून मोठे व्हा. शाळेचे , गावाचे नाव मोठे करा असे आवाहन केले.
याप्रसंगी विद्यार्थ्याना पुढील शिक्षणसाठी लागणारे उत्पन्नाचे दाखले, रहिवाशांचा दाखला आदी दाखले तसेच आधार अपडेट शाळेमध्ये करून देण्यात आले. प्राचार्य बी बी पाटील यांनी संस्थे विषयी आणि शाळेत चालणाऱ्या विविध उपक्रमा विषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिंदे सर यांनी केले तर उपस्थितांचे आभार ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख श्री कदम यांनी मानले.