जावली ! आदर्श पोलिस पाटील पुरस्काराने सुहास भोसले सन्मानित

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टिम------
जावली प्रतिनिधी (धनंजय गोरे)
महाराष्ट्र शासनाच्या वतीने दरवर्षी महसूल विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांचा महसूल दिनाच्या निमित्ताने सन्मान करण्यात येतो, त्याच अनुषंगाने जावली तालुक्यात महसूल व पोलीस प्रशासनास वेळोवेळी सहकार्य करून उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल सन २०२३ यावर्षी चा आदर्श पोलीस पाटील म्हणून खर्शी तर्फ कुडाळ गावचे पोलीस पाटील सुहास हणमंत भोसले यांना सन्मानित्त करण्यात आले.
      
       जावली तालुक्यातील मेढा येथे महसूल दिन कार्यक्रमात सुहास भोसले यांच्या वतीने त्यांचे बंधू सचिन भोसले यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब दराडे, तहसीलदार हणमंत कोळेकर, नायब
तहसीलदार संजय बैलकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार वितरण करण्यात आला. सुहास भोसले यांनी पोलिस पाटील म्हणून संपूर्ण जिल्ह्यात उठावदार काम केले आहे. जावली तालुक्यात त्यांनी महिगाव, दुदुस्करवाडी, नरबदेव (मेरुलिंग ) या गावांचा चार्ज उत्कृष्टरित्या सांभाळला. कोरोना योद्धा म्हणून त्यांनी केलेले काम पोलिस पाटील यांच्यासाठी प्रेरणादायी ठरले आहे. पोलिस व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करण्याची त्यांची हातोटी त्यांना पुरस्कार देऊन गेली. खर्शी तर्फ कुडाळ गावांत पोलिस पाटील म्हणून काम करताना त्यांनी कायदा सुव्यवस्था राखण्याबरोबरच गावच्या सर्वांगीण विकासासाठी मोठे योगदान दिले आहे.
     सुहास भोसले यांना मिळालेल्या आदर्श पोलीस पाटील पुरस्काराबद्दल खर्शी तर्फ कुडाळ ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले तसेच विविध स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे
To Top