मेढा ! सह्याद्री माध्यमिकच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा बापु फौंडेशनचे वतीने सत्कार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-- --
मेढा : प्रतिनिधी
मार्ली ता जावली येथिल सह्याद्री माध्यमिक विद्यालयामधील गुणवंतांचा सत्कार बापू फाउंडेशन यांच्यामार्फत घेण्यात आला.
        या वेळी इयत्ता आठवी ते दहावी प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम प्रमाणपञ व शालेय उपयोगी साहित्य देण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  कै.श्री साहेबराव रामचंद्र गोळे यांच्या स्मरणार्थ बापु फौंडेशनने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
          यावेळी फौंडेशनच्या अध्यक्षा डाॅ शितल गोळे आडके यांनी फौंडेशनचा उद्देश आणि विद्यार्थांना प्रेरणादायी असे मार्गदर्शन केले. प्रतापगड एज्युकेशन सोसायटी (खजिनदार)  अंकुश धनावडे, मार्ली गावचे माजी सरपंच रामचंद्र गोळे, दिवदेव गावचे ग्रामस्थ जी .डी .जुनघरे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.  विद्यालयाच्यावतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनिल धनावडे यांनी केले. सुञसंचलन रांजणे सर यांनी केले तर शेटे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी पंचक्रोशितील सरपंच पोलिस पाटील ,विविध मंडळाचे पदाधिकारी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष , सदस्य,  ग्रामस्थ, पालक उपस्थित होते.
To Top