वाई ! शाळेत चोरी होऊ नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे बसवले : चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरच मारला डल्ला

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम---  
वाई : प्रतिनिधी
वाई तालुक्यातील ओझर्डे या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये अज्ञात चोरट्याने सीसीटीव्ही चोरी केल्याचा प्रकार घडला ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली दरम्यान या घटनेची नोंद भुईंज पोलिस ठाण्यात झालेले नव्हती.  चोरट्याने शाळेची बाथरूमची पाइप ही मोडतोड केल्याचे निदर्शनास आले आहे ओझर्डे गावातील प्राथमिक शाळा ही बुधवारी नेहमीप्रमाणे शिक्षक मुख्याध्यापक हे शाळा संपल्यानंतर कुलूप लावून गेले होते त्यानंतर गुरुवारी सकाळी काही ग्रामस्थांनी शाळेचा दरवाजा उघडला असल्याचे पाहिले त्यावरून त्यांनी ही बाब शिक्षकांना सांगितली. शाळेत आत जाऊन पाहिले असता शाळेतील सीसीटीव्ही चोरीला गेल्याचे निदर्शनास आले तसेच शाळेतील बाथरूमच्या पाईप यांचीही मोडतोड अज्ञातांकडून झालेली आहे याची नोंद पोलिस ठाण्यात झालेली नव्हती  .
To Top