सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मोरगाव : प्रतिनिधी
बारामती तालुक्यात सांयबाचीवाडी ग्रामपंचायत अंतर्गत मतदार यादीत बोगस नावांचा समावेश असल्याने दोनशे ग्रामस्थांनी बारामती तहसील कचेरी समोर आज उपोषण सुरू केलय. महसूल प्रशासनाने हलगर्जीपणा केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
सायबांची वाडी येथील ग्रामपंचायत मतदार- यादीत बोगस नावांमुळे हा वाद समोर आलाय. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष दुर्योधन बापू भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली येथील आज सुमारे 200 महिला व पुरुष यांनी एकत्र येऊन बारामती प्रशासकीय इमारतीसमोर आज उपोषण सुरू केले. गावचे रहिवासी नसलेली लोकांची बोगस नावे यादीत समाविष्ट असल्याची तक्रार आहे. वारंवार कळवूनही महसूल विभाग दुर्लक्ष करीत आहे. महसूल या विभागाचे अधिकारी मनमानी मुळे हा वाद चिघळला आहे.
याबाबत बारामती यापूर्वी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे यापूर्वीच न्याय निर्णय झाला असून, बोगस नावे कमी करण्याचे 'आदेश' दिले होते. यानंतर मात्र बोगस नावे कमी न होता दुरुस्ती झाली नसल्याने ग्रामस्थ आज आक्रमक झाले. ही नावे कमी करा या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले. याबाबत दखल घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे