सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
शिरूर : धर्मा मैड
शिरूर येथील मळगंगा ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानातून खरेदीच्या बहाण्याने अनोळखी महिलेने सुमारे २६ हजार रुपये किमतीचे मंगळसुत्र चोरी केल्याची घटना घडली असुन सी.सी.टी.व्ही फुटेज मध्ये आरोपी महिलेच वर्णन आले आहे.
याबाबत शिरुर पोलीस ठाण्यात राजेंद्र अरुण लोळगे व्यवसाय सराफ दुकान रा. मारुती आळी शिरूर ता. शिरुर जि. पुणे आरोपी अनोळखी महिले विरोधात चोरीची तक्रार दिली आहे . त्यानुसार पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवार दि.१७ रोजी दुपारी एक वाजणेच्या सुमारास शिरुर सराफ बाजार पेठेतील मळगंगा ज्वेलर्स सोन्याचे दुकानात येथे २६ हजार रुपये किमतीचे साडे चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे वाटीमणी मंगळसुत्र, दुकानात सराफ व्यवसायिक राजेंद्र लोळगे व कामगार महीला निता ससाणे असताना एक अनोळखी महीला सोने खरेदी करणेकरीता दुकानात आली तेव्हा त्या अनोळखी महीलेने वाट्या मनी मंगळसूत्र दाखवण्यास सांगितले. तेव्हा निता ससाणे हीने काऊंटरवर लाल कापड टाकले त्यावर लोळगे यांनी वाट्या मनी मंगळसुत्र ठेवले . त्यावेळी निता त्या अनोळखी महीलेस वाटीमणी मंगळसुत्र दाखवीत असताना अनोळखी महीला हीने एक एक वाटी मणी मंगळसुत्र हातात घेवुन पाहीले व पसंद नाही म्हणुन दुकानातुन निघुन गेली . त्यानंतर राजेंद्र लोळगे हे काऊंटवरील मणी मंगळसुत्र ठेवुन देत असताना त्यामध्ये एक वाटी मणी मंगळसुत्र कमी असल्याचे निदर्शनास आले . तेव्हा त्यांनी काऊंटरच्या खाली कोठे तरी पडले आहे का हे पाहीले असता ते वाटी मंगळसुत्र मिळुन आले नाही म्हणुन दुकानातील सी.सी.टी.व्ही फुटेज चेक केले असता फुटेजमध्ये त्या अनोळखी महीला हातचलाखीने एक वाटी मंगळसूत्र चोरी करून निघुन गेल्याचे दिसले . त्यानुसार अनोळखी महिलेविरुद्ध चोरी बाबत राजेंद्र अरुण लोळगे यांनी या प्रकरणी तक्रार दिली असुन पुढील तपास शिरूर पोलिस करीत आहेत .