नीरा खोऱ्यातील शेतकऱ्यांसाठी Good News ! संतोष म्हस्के ! नीरा-देवघर धरण १०० टक्के भरले

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हके
भोर तालुक्यासह पूर्वेकडील इंदापूर, बारामती ,फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांची जलवाहिनी समजली जाणारे १२ टीएमसी असलेले हीरडोस मावळ खोऱ्यातील नीरा- देवघर ता.भोर धरण रविवार दिं.२० पूर्ण क्षमतेने  १०० टक्के भरले असून सध्या  धरणात ३५० क्युसेक्स विद्युतग्रहाद्वारे नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असनारा रात्री १२ नंतर ७५० क्यूसेक्स वाढ करण्यात येणार आहे.पावसाच्या तीव्रतेनुसार विसर्गामध्ये आवश्यक कमी/अधिक बदल होऊ शकतो असे नीरा पाटबंधारे उपविभागिय सहाय्यक अभियंता यो.स.भंडलकर यांनी सांगितले.
        धरण क्षेत्रात मागील महिनाभरात पावसाचा जोर कायम असल्याने नीरा-देवघर धरण १०० टक्के भरले आहे.यामुळे धरणाच्या पूर्वेकडील भागातील पाझर तलाव,विहिरी,बंधारे पूर्ण भरून वाहू लागले आहेत.धरणाच्या पूर्वेकडील तसेच परिसरातील राहणाऱ्या नागरिकांचा, गुरे - ढोरे ,बकऱ्या ,वन्य प्राण्यांच्या पिण्याचा प्रश्न मिटला आहे.शेतीसाठी पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.तालुक्यात तीन ते चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असल्याने खरिपातील भात पिकांना पाणी कमी पडू लागले आहे. परिणामी शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
भोर तालुक्यातील जलाशयांची आकडेवारी पुढील प्रमाणे
 भाटघर-८८.६ टक्के,गुंजवणी-८१.७६ टक्के, टक्के,वीर -७६.११ टक्के पाणी साठा असून लवकरच ही तीनही धरणे पूर्ण क्षमतेने भरतील अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
To Top