बारामती ! करंजेपुलची आयसीआयसीआय बँक म्हणजे असून अडचण नसून खोळंबा : ग्राहकांमध्ये संतापाची भावना

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
आय.सी आय.सी.आय.च्या करंजेपुल येथील शाखेतील सेवा गेली अनेक महिन्यापासून विस्कळीत झालेली असून यामध्ये कोणती हि सुधारणा होताना दिसत नसल्याचे बारामती सराफ असोसिएशन चे अध्यक्ष किरण आळंदीकर यांनी सांगितले.
           बँकेने सोनेतारण कर्जासाठी शाखांना टार्गेट दिलेले असते हे टार्गेट पूर्ण करताना शाखा प्रमुखांची दमछाक होताना दिसून येते, कसे बसे सोनेतारण व्यवहार केले तर ग्राहकांना पुन्हा दागिणे सोडवताना 3/4 दिवस सांगून हि दागिणे लवकर परत मिळत नाही. प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे सांगितली जातात, पैसे भरून घेतले जात नाहीत त्यामुळे ग्राहकांना दागिणे वेळेत मिळत नसल्याची ग्राहकांची तक्रार असल्याचे आळंदीकर यांनी सांगितले, याशिवाय या बँकेकडे एका सराफ व्यवसायिकाकडे पूर्वी सोनेतारण व्यवहार होता, या सराफाला दुसऱ्या बँके कडे सोनेतारण करण्यासाठी अनुभव असल्याचे प्रमाणपत्र हवे म्हणून 1 महिन्यापूर्वी सांगून हि अद्याप बँकेने सराफा ला प्रमाणपत्र दिले नाही.
              इतर बँका 7 ते 8 टक्के व्याजदराने कर्ज देत असताना या शाखेकडे ग्राहक पाहून 14 ते 15 टक्क्यापर्यंत व्याजदर लावला जात असल्याने ग्राहक इतर बँकेकडे सोनेतारण व्यवहारासाठी वळत असताना दिसून येते,येथे सोनेतारण करणाऱ्या नवीन सराफा कडून हि मूल्यांकनामध्ये चुका होत असल्याने ग्राहकांचे खाते बंद करून त्या ग्राहकाला दागिना सोडवण्यास सांगितले जाते. अनुभवी सराफा ची नेमणूक व्हावी व व्याजदर कमी करावा असे काही ग्राहकांनी बँकेच्या निदर्शनास आणून दिले तरी देखील त्याकडे करंजेपुल शाखेकडून कानाडोळा होत असल्याने ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर असल्याने आपले व्यवहार इतर बँके कडे वळविले आहेत.
To Top