सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
कोऱ्हाळे : प्रतिनिधी
कोऱ्हाळे खुर्द, ता. बारामती, जि. पुणे येथे चालू असलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत कामाच्या बेकायदा मुरूम उत्खनन करत ते नदी पात्रातटाकुन गावाला व पर्यावरणास धोका केला जात आहे.याबाबत बन्सीलाल सोपान गावडे यांनी बारामतीच्या तहसीलदाराकडे धाव घेतली आहे.
याबाबत गावडे यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोऱ्हाळे खुर्द हे गाव निरा नदीच्या काठी वसलेले असुन, नदीचे पूरसिमा रेषाक्षेत्र हे लोकवस्तीचे अगदी नजीक असुन, नदीचे नैसर्गिक प्रवाह अडवुन त्या ठिकाणी जलजीवन मिशन योजने अंतर्गत पाणी साठवण तलावाचे काम चालू आहे. या कामातून उत्खनन होणारे मुरूम हे गौणखनिज नदी पात्रात बेकायदेशीरपणे टाकून नदीपात्र अडवून प्रवाह बदलण्याचा धोका निर्माण झाला आहे. जर पावसाळ्यामध्ये पुराचे पाणी आले तर ते गावामध्ये शिरून जिवीतहानी व वित्तहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे गेल्या काही वर्षामध्ये नदीपात्रात अतिक्रमणामुळे गावात पाणी शिरण्याचा घटना या देशात व महाराष्ट्रात घडत आहेत.
तरी येत्या दोन दिवसात सदरचे गौणखजिन उचलुन योग्य त्या ठिकाणी विल्हेवाट न लावल्यास आम्ही समस्त ग्रामस्थ अमरण उपोषण करू व भविष्यात अतिक्रमणामुळे होणारे दुर्घनटनेस प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील. असे निवेदनात म्हटले आहे.