वाई ! ऊसतोडणी कामगार पुरवतो म्हणून बीड येथील मुकादमाकडून दोन शेतकऱ्यांची वीस लाखांची फसवणूक : वाई पोलिसात गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : प्रतिनिधी
वाई तालुक्यात ऊसतोड करण्याकरिता कामगार पुरवतो असे सांगून बीड येथील मुकादमाने दोन शेतकऱ्यांची वीस लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे.
           या प्रकरणी त्याच्यावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याचे नाव अनिल बंडू धोत्रे (रा. टाकरवन ता. माजलगाव जि. बीड) असे आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की संतोष धोंडीराम जायगुडे (रा. सिद्धनाथ वाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचे उसाचे शेत असून त्या उसाची तोड करण्याकरता ऊसतोड मजूर पुरवण्याचे अमिष दाखवून त्यांच्याकडून अनिल बंडू धोत्रे याने अकरा लाख 89 हजार रुपयांची रक्कम घेतली. तर त्यांचा मित्र विजय रामचंद्र जमदाडे यांच्याकडून धोत्रे यांनी आठ लाख पंधरा हजार रुपयांची रक्कम स्वीकारली अशी एकूण वीस लाख चार हजार रुपयांची रक्कम घेऊन त्याने मजूर पुरवठा केलेला नाही.हे पैसे वाई येथील जिल्हा बँकेच्या शाखेतून आणि महाराष्ट्र बँकेच्या शाखेतून दिनांक 22 जुलै 2022 रोजी देण्यात आले. यावरून धोत्रे याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याचा तपास वाई पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज हे करत आहेत.
To Top