Bhor News ! अज्ञात वाहनांच्या धडकेत भोर-आंबाडखिंड रस्त्यावरील अपघातात एकाचा मृत्यू

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर- आंबाडखिंड मार्गावर जेधेवाडी ता.भोर मार्गावर पोळवाडी फाट्या नजीकच्या उताराला चारचाकी अज्ञात वाहनाने शुक्रवार दिं.२५ सायंकाळी सातच्या दरम्यान लक्ष्मण परशुराम थोपटे( वय -४८) यांच्या दुचाकी गाडीला जोरदार ठोकर दिल्याने उपचारादरम्यान लक्ष्मण थोपटे यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
     लक्ष्मण थोपटे हे सायंकाळच्या वेळी जेधेवाडी येथे घरी जात असताना भोर -आंबाडखिंड मार्गावर पोळवाडी फाट्या नजीक मांढरदेवी कडून येणाऱ्या भरदाव चारचाकी अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली.यात थोपटे हे रस्त्यावरच कोसळले.या मार्गावरून जाणाऱ्या तरुणांनी तात्काळ थोपटे यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.मात्र काही वेळातच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.अज्ञात चारचाकी वाहनावर भोर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून चारचाकी वाहनाचा शोध सुरू आहे.
To Top