सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
ललालपरी ग्रामीण भागातील दळणवळणाचा आत्मा आहे. आर्थिक उलाढालीची एसटी महत्त्वाचे साधन असून मायबाप गरीब कष्टकरी जनतेसाठी एसटी महामंडळ आहे त्याचा दर्जा चांगला ठेवून प्रवाशांना उत्तम सेवा पुरवा असे शुक्रवार दिं.२५ भोर एसटी आगारात खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रवाशांच्या समस्या जाणून घेताना अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
खासदार सुळे यांनी उपजिल्हा रुग्णालय भोर येथे भेट देवून विविध समस्यांची माहिती घेतली तर तालुक्यात शिक्षण विभाग व एसटी आगारात रिक्त पदांसाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत शिवतरे,तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे,जिल्हा बँक संचालक भालचंद्र जगताप, माजी विक्रम खुटवड, शहराध्यक्ष यशवंत डाळ, माजी शहराध्यक्ष नितीन धारणे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे,वंदना धुमाळ,रोहिदास जेधे ,गणेश खुटवड,संदीप नांगरे,हसीना शेख,युवराज जेधे,मनोज खोपडे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुळे पुढे म्हणाल्या विकासाला विरोध नाही.मात्र राज्यात मोठ्या शहरांमध्ये करोडो रुपये खर्चून मेट्रो होऊ शकते तर तीनशे कोटी रुपये एसटी महामंडळाला शासन का देऊ शकत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
---------------------------
राष्ट्रवादीत फूट पडलेली नाही-----
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार असून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत. पक्षाच्या विरोधात ९ आमदार व २ खासदारांनी वेगळी भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात विधानसभा अध्यक्षांकदे तक्रार केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नाही असेही खासदार सुळे यांनी सांगितले.