अभिमानास्पद ! बारामतीच्या शिरपेचात मानाचा तुरा : मुर्टी येथील ऋग्वेद नलावडेने आंतरराष्ट्रीय तायक्वोंदो स्पर्धेत पटकावले एक सुवर्ण तर एक रौप्य पदक

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मोरगाव : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील ऋग्वेद अभिजीत नलावडे याने आतंरराष्टीय तायक्वोंदो स्पर्धेत एक गोल्ड आणि एक रौप्य पदक  पटकावले. 
       दक्षिण कोरिया या ठिकाणी तायक्वोंदो खेळाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा घेण्यात आल्या, त्या स्पर्धेत  बारामती तालुक्यातील मुर्टी येथील असलेल्या ऋग्वेद याने सहभाग घेतला होता. त्याने या स्पर्धेत घवघवित यश सपांदन करत फुमसे या प्रकारात गोल्ड आणि फाईट या प्रकारात रौप्य पदक प्राप्त केले.
     या स्पर्धेत दक्षिण कोरिया, चीन,भारत, इराण,नेपाळ, श्रीलंका, रशिया ऑस्ट्रेलिया  कझाकिस्थान, ब्राजिल, असे इतर एकुण 24 देशातिल मुलांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेत साधारण 4000 ते 4500 मुलांनी विविध प्रकारामध्ये सहभाग नोंदविला होता.
      ऋग्वेद हा गेले दोन वर्षे सासवङ येथिल श्रीलक्ष्य तायक्वोंदो असोशिएशन या क्लब अतर्गंत  जयदिप मंगल कार्यालय,सासवङ येथे प्रशिक्षक किरण गायकवाङ व माधुरी गायकवाङ यांच्या मार्गदर्शानाखाली प्रशिक्षण घेत आहे. ऋग्वेद यांचे आजोबा लालासाहेब नलावडे  सोमेश्वर कारखान्याचे मा. संचालक व राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आहेत. तसेच वङील नामांकित उद्योजक आहेत. तालुक्यातून ऋग्वेदचे कौतुक होत आहे.
To Top