पुरंदर ! विजय लकडे ! तालुक्यात दुष्काळाची छाया गडद : पाऊस नसल्याने बाजारपेठा ओसाड

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : प्रतिनिधी
कोकण आणि उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्याचा काही भाग वगळता पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाने दडी मारली आहे. अशीच दुष्काळ सदृश्य परिस्थिती नीरा पंचक्रोशी जाणवत असल्याने याचा परिणाम नीरा तालुका पुरंदर येथील बाजारपेठेवर दिसून येत आहे.
          नीरा पंचक्रोशी मध्ये या पावसाळ्यातील एकही मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबर सर्वच व्यावसायिक हवालदिल झाल्याचे दिसून येत आहे. सर्वांनी दुष्काळाला तोंड देण्यासाठी खर्चाचे बाबतीत हात आकडता घेऊन काटकसरीचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे पावसाळ्यातील सर्व सण उत्सव कोरडे गेले. रक्षाबंधन हा बहिण भावाचा आनंदी सण ही काटकसरीत साजरा करावा लागणार आहे अशी चिन्हे दिसत आहेत. तसेच दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा दहीहंडी व गणेशोत्सव यावरही परिणाम होणार आहे.
         शेतीवर उलाढाल अवलंबून असणाऱ्या शेतकरी व सर्व व्यावसायिकांनी दुष्काळामुळे बांधकामे, लग्न इतर धार्मिक उत्सव लांबणीवर टाकले आहेत. निरा बाजारपेठेमध्ये खते औषधे बी बियाणे, कापड व्यावसायिक, किराणा, स्टील, फर्निचर या व्यवसायिकांना दुष्काळाची झळ प्रचंड प्रमाणात सहन करावी लागत आहे. दुष्काळामुळे रोजगारावरही परिणाम झाल्याने एकंदरीतच  निरा बाजारपेठेमध्ये निरुत्साह व शुक शुकाट पाहायला मिळत आहे.
To Top