सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुणे : प्रतिनिधी
पुण्यातील एका प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक महिलेने तिच्या बॉडीगार्ड प्रियकराबरोबर स्वतःच्या पाच वर्षीय मुलीसमोरच रासलीला करण्याचा प्रकार घडला आहे. मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवून तिचाही लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक देखील प्रकार उघडकीस आला आहे. एका जागृत शिक्षिकेच्या 'गुडटच - बॅडटच'च्या संवादातूनमधून मुलगी बोलती झाली आहे. विद्येच्या माहेरघरात घडलेल्या घृणास्पद घटनेबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
पाच वर्षीय मुलीबरोबर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा प्रकार ( दि. २३ ) रोजी उजेडात आला. शिवाजीनगर व गोवा येथे हा प्रकार घडला असून पुण्यातील मोदीबाग, यूनीवर्सीटी रोड येथील ३४ वर्षीय हॉटेल व्यावसायिक महिला व हेवन पार्क, लेन नं. ८ मोहम्मदवाडी पुणे येथील तिचा बॉडीगार्ड यांच्यात अनेक महिन्यापासून अनैतिक सबंध प्रस्थापित निर्माण झाले होते. पती घरात नसताना महिला ही मद्यप्राशन करून तिचा बॉडीगार्ड प्रियकरा सोबत पिडीत मुलीसमोरच अश्लील चाळे व शारीरिक सबंध करायचे. तसेच दोन्ही आरोपीनी मुलीला मोबाईलमध्ये घाणेरडे व्हिडीओस दाखवून मुलीबरोबर जबरदस्तीने छेडछाड कृत्य केले.
दरम्यान, वारंवार घडलेल्या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारून टाकण्याची धमकी पिडीत मुलीला तिची आई व तिचा बॉडीगार्ड देत असल्याचे देखील फिर्यादीत म्हटले आहे.
सदर मुलगी ही तिच्या वडिलाबरोबर नात्यातील असलेल्या एका शिक्षिकाच्या घरी गेली होती. यावेळी शाळेमध्ये गुडटच - बॅडटच आणि लहान मुलांना घरात होणा-या त्रासाबद्दल एका महिलेबरोबर सदर शिक्षिका बोलत होत्या. त्यांचे बोलणे ऐकलेली पीडित मुलगी रडू लागली. यावेळी तिला शिक्षिका महिलेने विश्वासात घेऊन विचारपूस केली असता हा धक्कादायक प्रकार सांगितला. पिडीत मुलीच्या जबाबनंतर वाकड पोलीस ठाण्यात पोस्को कायद्यानुसार गुन्हा करण्यात आला असून पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहे.
------------
आरोपी मोकाट
गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल असतानादेखील तीन दिवस उलटून देखील पुणे शहर पोलीसांनी हाताची घडी बांधल्याने आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी सामाजिक संघटनामधून होत आहे.