Bhor Breaking ! संतोष म्हस्के ! भोर शहरात दिवसाढवळ्या घरफोडी : पाच लाखांची रोकड लंपास

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर शहरात नागोबाळी येथे १०/८/२३ ते २१/८/२३ च्या दरम्यान दुपारी अरुण दिगंबर बुरांडे यांच्या घराच्या बेडरूमची लाकडी कपाट व लॉकर तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख ५ लाख रुपयाची चोरी केल्याची घटना घडली.याची अज्ञात चोरट्यांविरुद्ध फिर्याद भोर पोलिसात देण्यात आली.
     बुरांडे यांच्या पहिल्या मजल्यावर राहत्या घराचे बेडरूम मध्ये लाकडी कपाट व लॉकर अज्ञात चोरट्यांनी फोडून ५ लाख रुपयांची रोख रक्कम चोरी केली. भोर शहरात दिवसाढवळ्या चोऱ्या होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पुढील तपास भोर पोलीस करीत आहेत.
To Top