सोमेश्वर रिपोर्टर टिम------
जावली प्रतिनिधी (धनंजय गोरे )
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मान्यतेने राज्य व सांस्कृतिक कार्य शासनाच्या मानधन समिती सदस्यपदी जावली तालुक्यातील पिंपळी-पवारवाडी येथील शैलेंद्र दत्तात्रय पवार यांची निवड करण्यात आली.
गेल्या अनेक वर्षापासून अनेक चित्रपट टीव्ही मालिका नाटक याच्यामध्ये काम करत असताना सर्वसामान्य कलाकाराला किती संकटाचा सामना करावा लागतो याची जाणीव.असलेले कलाकार म्हणून शैलेंद्र पवार यांची ओळख असून त्यामुळे येणाऱ्या काळात मी देखील येणाऱ्या काळामध्ये कलाकारांना न्याय देण्याचा प्रयत्न करेन. खऱ्या अर्थाने समाजातील प्रत्येक घटकाचा महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विचार करत आहेत व त्याचाच एक भाग म्हणून राज्य व सांस्कृतिक कार्य शासनाच्या मानधन मानधन समितीद्वारे समाजातील आपल्या संस्कृतीचे जतन करणाऱ्या कलाकारांना मानधन मिळाले पाहिजे हा विचार आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी केला आहे व त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ते काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराज देसाई, जिल्ह्य संपर्कप्रमुख कणसे साहेब, जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव, तसेच मानधन समितीचे अध्यक्ष जयवंत शेलार,मार्गदर्शक एकनाथ ओंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार करेन तसेच जावली तालुक्यातील आणि सातारा जिल्ह्यातील अनेक मान्यवरांच्या सूचना देखील काम करत असताना मौलिक ठरतील. त्या त्यांनी कराव्या असे आवाहन शैलेंद्र पवार यांनी केले