बारामती ! शेकडो सर्पांना जीवदान देणाऱ्या सर्पमित्रावरच नागाचा दंश : खराडेवाडी येथील घटना

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मोरगाव : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील खराडेवाडी येथे आज  सर्पमित्राला विषारी नागाने दंश केला असल्याची घटना घडली.  लोणी भापकर ता. बारामती येथील विजय छबुराव  यादव या सर्पमित्राचे नाव असून ते सर्प पकडण्यासाठी गेले असता सदर घटना आज सकाळी घडली  आहे.
        याबद्दल सविस्तर वृत्त असे की लोणी भापकर ता. बारामती येथील विजय  यादव हे गेल्या अनेक वर्षापासून विषारी व बिन विषारी साप पकडतात. कोणाच्या घरात,  तर कोणाच्या दुकानात, अगदी गोठ्यात निघालेल्या  सर्पास  ते  अनेक वर्षे  जीवदान देत आलेले आहेत.  आज बारामती तालुक्यात  खराडवाडी येथील  युवराज भापकर यांच्या  घरी विषारी नाग निघाला असता ते पकडण्यासाठी गेले . गाईंच्या  चाऱ्यासाठी  बनवलेल्या मुरघासाच्या खड्ड्यामध्ये  हा विषारी नाग होता.
        यादव हे या नागास पकडण्यासाठी  खराडवाडीला गेले असता  विषारी नाग पकडत असताना त्यांच्या हातास नागाने  चावा  घेतला . मात्र अशाही परीस्थितीत त्यांना त्या नागास पकडून मोकळ्या रानात सोडून दिले. यानंतर यादव यांच्या प्रकृती अस्वस्थतामुळे उपचारासाठी बारामती येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले असून ते तब्बल ८ तासांपेक्षा अधीक बेशुद्ध अवस्थेत आहेत.  यादव यांनी आतापर्यंत शेकडो सर्पांना जिवदान दिले असल्याने  तालुक्यातील सर्पमित्र व शेतकऱ्यांकडून ते लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना  केली जात आहे.
To Top