Bhor Big Breaking ! भाटघर धरण बॅक वॉटरच्या पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू : भोर तालुक्यातील जयतपाड येथील घटना

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
 भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील भाटघर धरण बॅक वॉटरला असणाऱ्या वेळवंड-पांगारी खोऱ्यातील जयतपाड ता.भोर येथे पर्यटनासाठी आलेल्या पुणे येथील एक तरुणी व एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून अजूनही पाण्यात तीन जण बुडाल्याची भीती स्थानिकांकडून वर्तवली जात आहे.
    जयपाड ता.भोर येथील मुंगळे रिसॉर्ट (सीमा फार्म) जवळील धरणाच्या पाण्यात  या पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला असून पाण्यातून तरुणीचा मृतदेह बाहेर काढल्याची माहिती स्थानिकांनी दिली. तर अजूनही पाण्यात तीन जण बुडाले असल्याचे सांगण्यात आले.भोर पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचले असून शोध कार्य सुरू आहे.
To Top