सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : प्रतिनिधी
निंबुत येथील बा सा काकडे विद्यालयात ७७ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयाचे ध्वजारोहण जिल्हा परिषद व बांधकाम आरोग्याचे माजी सभापती प्रमोद काकडे यांचे शुभहस्ते झाले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आलेल्या मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापिका दिपाली ननवरे यांनी रोपे भेट देऊन केले.
यावेळी स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर जिव्हिलियंट भारतीय फाउंडेशनच्या वतीने विज्ञान प्रयोगशाळा विद्यालयास भेट देण्यात आली. या प्रयोगशाळेचे उद्घाटन शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे ज्यूबिलियंटचे उपाध्यक्ष सतीश भट व त्यांचे अधिकारी नींबूतचे सरपंच, उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य साहेबराव दादा सोसायटी सर्व संचालक विद्यालयाचे उपाध्यक्ष भीमराव बनसोडे मानद सचिव मदन काकडे यांचे उपस्थितीत होते.
स्वतंत्र दिनानिमित्त सृष्टी धुमाळ दीक्षा पोटे व वेदांत केंजळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सतीश भट यांनी विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी विज्ञान प्रयोगशाळाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे सांगितले.
मनोगतामध्ये सतीश काकडे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. एस एस सी मार्च 2023 मध्ये विद्यालयात प्रथम तीन क्रमांका आलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळी वस्ती येथील ध्वजारोहण ग्रा प. सदस्या विद्यादेवी काकडे, सुवर्णा लकडे व गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद शाळा कोळी वस्ती येथील विद्यार्थ्यांना अभिजीत काकडे युवा मंच यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व विराज जगताप यांच्या हस्ते स्पोर्ट्स किट भेट देण्यात आले विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना यावेळी खाऊ वाटप करण्यात आले