Bhor News ! पाचोरातील पत्रकार मारहाण प्रकरणी तहसीलदारांना निवेदन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
पाचोरा जि.जळगाव येथील पत्रकार संदीप महाजन यांना आमदार किशोर पाटील यांनी मारहाण केल्याप्रकरणी पत्रकार संघ भोरच्या वतीने राज्यपाल (महाराष्ट्र राज्य) द्वारा तहसीलदार भोर यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले.
      पत्रकार संघ भोर पदाधिकारी व सदस्य यांची बैठक रविवार दिं.१३ होऊन पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार संदीप महाजन यांना आर्वाच्छ शब्दात शिविकल करून दुसऱ्या दिवशी गुंडांकडून मारहाण केली या घटनेचा निषेध केला.तर सदर प्रकरणातील दोषीवर गुन्हे दाखल करून कठोर शास्त्र व्हावे अशी मागणी संघाच्या वतीने करण्यात आली.याचे निवेदन भोर तहसीलदार सचिन पाटील यांना संघाच्या वतीने दिले. तसेच भविष्यात राज्यातील पत्रकारांवर असे हल्ले होणार नाहीत याबाबत पत्रकार संरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी होण्यास विनंती करण्यात आली. यावेळी अध्यक्ष पुरुषोत्तम मुसळे ,सचिव संतोष म्हस्के, खजिनदार दत्तात्रय बांदल ,सहसचिव कुंदन झांजले, सदस्य दीपक पारठे उपस्थित होते.

To Top