सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
फलटण : गणेश पवार
नीरा उजवा कालव्याचे अस्तरीकरण कोणत्याही परिस्थितीत करून देणार नाही तसेच या विरोधात प्रचंड मोठे जन आंदोलन उभे करून या कामाची निविदा रद्द होईपर्यंत हा लढा सुरू ठेवणार असल्याचे व शासनाने याबाबत लवकर निर्णय न घेतल्यास भविष्यात होऊ घातलेल्या कोणत्याही निवडणुकीला मतदान करणार नसल्याची संतप्त प्रतिक्रिया तडवळे तालुका फलटण येथील निरा उजवा कालवा बचाव संघर्ष समितीच्या वतीने आयोजित बैठकीवेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली
शंभर वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी आमच्या जमिनीमधून कालवयाची निर्मिती करताना त्याचा एकही रुपया मोबदला आमच्या वाडवडिलांना दिला नाही त्या बदल्यात आमची जिरायत जमीन ओलिताखाली येऊन आम्ही बागायतदार झालो मात्र अल्पावधीत शेती महामंडळाची स्थापना करून शासनाने या जमिनी कसण्यासाठी ताब्यात घेतल्या त्या आता परत शेतकऱ्यांना मिळाल्यानंतर आता कुठे या भागातील शेतकरी स्थिरावत असताना हे अस्तरीकरण करून आमची शेत जमीन तुम्हाला परत उजाड करायची आहे का? असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित सर्वपक्षीय पदाधिकारी व शेतकऱ्यांनी केला यावेळी पूर्व भागातून आलेल्या गुणवरे, राजुरी व टाकळवाडा येथील शेतकरी आपली भूमिका मांडताना म्हणाले, पूर्व भागातील काही लोक अस्तरीकरण करावे अशी मागणी करून या भागातील शेतकऱ्यांचा आम्हाला पाठिंबा असल्याचे भासवत असले तरी पूर्व भागातील ९० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांचा या अस्तरीकरणाला विरोध आहे पुढील आठवड्यात या भागातील ग्रामपंचायतांचे अस्तरीकरण विरोधातील ठराव घेणार असून कोणत्याही परिस्थितीत अस्तरीकरण करून दिले जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी भगवान होळकर, नानासो उर्फ पिंटू ईवरे, रमेश बोंद्रे, अशोक खराडे,शेखर खरात, शिराज भाई शेख, रवींद्र टिळेकर सर, नाना येळे, जगन्नाथ सूळ, संतोष ठोंबरे, आदित्य गायकवाड, सतीश झाडगे, सुभाष घाडगे, त्रिंबक डोंबाळे, रामभाऊ माने,अमोल खराडे व पाडेगाव, कुसुर, रावडी खुर्द, रावडी बुद्रुक, सासवड, काळज, तडवळे, मुरूम, साखरवाडी, सुरवडी, खामगाव,होळ, वडजल, निंभोरे, तरडगाव,डोंबाळवाडी या गावातील शेतकरी व सर्वपक्षीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते