बारामती ! जे भाजपसोबत जातील.... अजित पवार गटाला शरद पवार यांचा स्पष्टच इशारा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : महेश जगताप
ज्यांची भूमिका भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्याची आहे त्यांच्याशी आमचा कोणत्याही प्रकारचा आमचा संबंध नाही असे शरद पवार यांनी स्पष्ट करत अजित पवार यांच्या गटाला स्पष्ट आज पुन्हा इशारा दिला आहे. 
          बारामती येथे ते पत्रकारांशी बोलत होते. पवार पुढे म्हणाले, महाविकास आघाडीत कोणताही संभ्रम नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले काल सोलापूरला असताना या सर्व गोष्टी आम्ही स्पष्ट केलेल्या आहेत त्यामुळे ही गोष्ट एकदा स्पष्ट केल्यानंतर पुन्हा पुन्हा पत्रकारांनी संभ्रम वाढवण्याची गरज नाही. 
एका वर्तमानपत्रात आज छापून आलेल्या एका लेखाबद्दलही शरद पवार यांनी पत्रकारांनाच खडसावले त्यांनी काय लिहिले आहे ते मी सांगण्याची गरज काय ते त्यांचे मत आहे की माझे मत आहे असाही प्रति प्रश्न पत्रकारांनी केला.  महाविकास आघाडीची बैठक ३० ऑगस्ट रोजी संध्याकाळी हॉटेल हयात येथे होणार आहे.
         यासाठी सर्व पक्षांच्या नेत्यांना बैठक सांगितलेली आहे.या बैठकीमध्ये आयोजित करण्याच्या संदर्भातील जबाबदारी मी स्वतः उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी घेतलेली आहे आणि ही बैठक यशस्वी ते आम्ही करून दाखवू असेही पवारांनी स्पष्ट केले.
राज्यातील काही भागांमध्ये थोडा देखील पाऊस पडलेला नाही अगदी बारामती सारख्या ठिकाणी देखील टँकर मागवा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर काही भागांमध्ये लोक चारा छावणीची मागणी करू लागले आहेत.
पाऊस पडला नसल्यामुळे पेरण्या तर झाल्या परंतु उगवण झालेली असल्यामुळे त्या ठिकाणी दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे..
        पवार म्हणाले देशामध्ये संसदेच्या अधिवेशनात काहीही हाती लागलेले नाही कारण मणिपूर हे फक्त राज्य नाही तर या ठिकाणी सात अशी राज्य आहेत जी संवेदनशील आहेत आणि त्याच्या शेजारी मोठा देश आहे अशा परिस्थितीमध्ये मणिपूर विषयी भूमिका स्पष्ट करणे गरजेचे होते 
मात्र पंतप्रधानांनी त्याच्या सर्वात मोठ्या भाषणात अत्यंत छोटा उल्लेख करत याविषयीची भूमिका जी त्यांची आहे ती त्यांनी मांडली आहे परंतु एकंदरीत राज्यकर्त्यांनी जी भूमिका घ्यायला पाहिजे ती घेतलेली दिसत नाही त्यामुळे संसदेच्या अधिवेशनात काहीही हाती लागलेले नाही.
           काँग्रेस मणिपूरच्या प्रश्नांमध्ये राजकारण करतात असा आरोप सत्ताधारी करतात मात्र तीस वर्षापूर्वी काय झाले याच्यापेक्षा नऊ वर्ष तुमच्याकडे सत्ता आहे जर काँग्रेसने काय केले नसेल तर तुम्हाला सत्ता दिली होती मग या नववर्षा तुम्ही काय केले हे मात्र ते सोयीस्कर विसरत असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
To Top