भोर ! संतोष म्हस्के ! शासकीय यंत्रणा ढेपाळली... प्रशासनाच्या उदासीनतेमुळे भोर तालुक्यात 'हर घर तिरंगा'चा नागरिकांना विसर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर ! संतोष म्हस्के
केंद्र सरकार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियान देश पातळीवर राबवत असले तरी भोर तालुक्यात नागरिकांना हर घर तिरंगा उभारण्याची माहिती नसल्याने फक्त हर शासकीय कार्यालयांमध्ये राष्ट्रध्वज उभारल्याचे चित्र होते.
        प्रत्येक नागरिकाच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी तसेच राष्ट्र उभारणीसाठी ज्यांनी अथक परिश्रम घेतले त्यांच्या एक योगदानाचे स्मरण करून प्रत्येक भारतीयांच्या घरावर भारताचा राष्ट्रध्वज फडकविण्यातस प्रोत्साहित करण्यात आले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ग्रामीण तसेच शहरी भागातील घरोघरी तिरंगा झेंडा उभारण्याची मोहीम सुरू झाली असली तरी भोर तालुक्यात बहुतांशी गावातील नागरिकांना शासनाकडून माहिती न मिळाल्याने रविवार दि .१३ तिरंगी झेंडे उभारले गेले नाहीत.घरांवर राष्ट्रध्वज उभारण्यासाठी उपलब्ध नाही, तिरंगी झेंडा उभारण्याची माहितीच कोणी शासकीय अधिकारी तसेच ग्रामपंचायत येथील पदाधिकाऱ्यांनी दिलेली नाही यामुळे घरोघरी तिरंगी झेंडे उभारले गेले नसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले.हर घर तिरंगा मोहीम रविवार दि.१३ राबविण्याची माहिती ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच ग्रामसेवक यांनी दिली असती तर आम्ही घरोघरी राष्ट्रध्वज उभारले असते असेही नागरिक म्हणाले.
    हर घर तिरंगा अभियान रविवार दि.१३ पासून राबविण्याचे सूचना शासनाकडून उशिरा मिळाल्या असल्या तरी तात्काळ तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांना संपर्क करून गावागावात हर घर तिरंगा मोहीम राबविण्यासाठी माहिती दिली होती असे गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे यांनी सांगितले.
-----------------------
नागरिकांकडे राष्ट्रध्वज उपलब्ध नाहीत
केंद्र शासनाने हर घर तिरंगा मोहीम सुरू केली असली तरी नागरिकांकडे राष्ट्रध्वज उपलब्ध नसल्याने तालुक्यातील बहुतांशी नागरिकांनी घरांवर तिरंगी झेंडे उभारले नाहीत असे कर्णावड ता.भोर येथील माजी सरपंच अशोक आंबवले यांनी सांगितले.
To Top