सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : विजय लकडे
पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या निरेमध्ये भरणाऱ्या आठवडे बाजारामध्ये निरा व आजूबाजूच्या पंचक्रोशीतील शेतकरी आपला तरकारी माल विक्रीसाठी घेऊन येत असतात तसेच आठवडे बाजारासाठी नोकरदार वर्ग गृहिणी व्यापारी व शेतकरी बांधव खरेदीसाठी येत असतात.
परंतु या आठवडे बाजारामध्ये दुचाकी,मोबाईल व पाकीट चोरीचे प्रमाण वाढलेले आहे. काल दोन ऑगस्ट रोजी सोपान भिकू गरदडे. रा गरदडवाडी या शेतकऱ्याची स्प्लेंडर गाडी क्र. MH 42 AP 3599 ही पुणे पंढरपूर महामार्गवर निरा पोलीस स्टेशनच्या लगत पार्क केलेली असताना. चोरीला गेलेली आहे.
साधारण एक महिन्यापूर्वी शंकर गुलदगड नीरा वार्ड क् ३ (मैत्री पार्क ) येथून त्यांची बुलेट क्र MH 42 AK 162 ही गाडी चोरीला गेली आहे. तसेच अजित लकडे यांची C T 100 गाडी आठवडे बाजारातून चोरीला गेली रमेश गरदडे यांची स्प्लेंडर तसेच अनेक जणांचे मोबाईल व पाकीट चोरीला गेलेले आहे. आठवडे बाजारात गस्त वाढवून
वाढत्या चोरीला आळा बसावा. अशी मागणी व्यापारी ग्रामस्थ निरा व शेतकरी वर्गातून होऊ लागले आहे.
वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिक त्रस्त आहेत.