सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
पबारामती तालुक्यातील मुरूम-लांडगोबामाळ येथील महादेव बबन हाके याची राज्य राखीव पोलीस दलात निवड झाली आहे.
महादेव हा लहानपणापासूनच हुशार आणि कष्टाळू मुलगा होता. त्याचे प्राथमिक शिक्षण हे कदमवस्ती येथील जि.प.प्राथमिक शाळेमध्ये झाले. माध्यमिक शिक्षण हे न्यु इंग्लिश स्कूल, वाणेवाडी येथे झाले. ११ वी पासून ते एम कॉम पर्यंतचे शिक्षण हे मु.सा.काकडे कॉलेज येथे झाले. शिक्षण पुर्ण करीत असताना काहीतरी करून दाखवायचे म्हणून अनेक स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करून वेगवेगळ्या ठिकाणी अनेक परीक्षा देत राहीला, मात्र त्याच्या वाट्याला वेळोवेळी अपयश हे येतचं राहीले. तेवढ्यावरच तो न थांबता त्याने अभ्यासात सातत्य ठेवत राज्य राखीव पोलीस दलाच्या परीक्षेमध्ये यश मिळविले.
शिक्षण घेत असताना वडील मेंढपाळ व्यवसायाचे काम करून त्याच्या शिक्षणाला मदत केली. घरच्यांच्या कष्टाची जाण ठेवून सातत्याने अभ्यास करून आज महादेवने राज्य राखीव पोलीस दलात यश मिळविले. त्याचे यश आणि गावात गावकऱ्यांनी काढलेली जंगी विजयी मिरवणूक पाहून अडाणी आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.
मुरूम - लांडगोबामाळ या छोट्याशा गावातील गरीब कुटूंबातील तरूणाची महाराष्ट्र राज्य राखील पोलीस दलात निवड झाल्यामुळे सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे..
------------------------
आई-वडिलांनी माझ्यासाठी लहाणपणी घेतलेल्या कष्टाची जाणीव ठेवून काहीतरी करून दाखवायचे स्वप्न मी पाहिले होते. ते सत्यात उतरविण्यासाठी त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवून लागेल ती मदत केल्याने आज त्यांच्या कष्टाचे चीज झाले. गणेश सावंत, महेश काळे, महेंद्र जमदाडे व संदीप चव्हाण यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.
महादेव हाके