पुरंदर ! आता जेजुरीत पाचव्यांदा शासन आपल्या दारी....'या' तारखेला मुख्यमंत्री येणार जेजुरीत

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
पुरंदर : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने सुरू केलेला शासन आपल्या दारी कार्यक्रम पुणे जिल्ह्यातील जेजुरीत आता नव्याने ०७ ऑगस्टला घेण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. याबाबतचे पत्र मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव तथा राज्य मुख्य समन्वयक डॉ.अमोल शिंदे यांनी पत्राद्वारे नुकतेच कळवले आहे. 
     "महाराष्ट्र शासन आपल्या दारी” हे अभियान मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतुन महाराष्ट्रातील सर्व जिल्हयांमध्ये राबविण्यात येत आहे.
शासन आपल्या दारी, हा कार्यक्रम सोमवार, दिनांक ०७ ऑगस्ट २०२३ जेजुरी, जि. पुणे येथे घेण्याबाबत मा. मुख्यमंत्री महोदयांनी वेळ दिलेली आहे. तरी या कार्यक्रमासाठी आपण योग्य ते नियोजन करुन मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाला कार्यक्रमाचा अहवाल व नियोजन सादर करावे हि विनंती. असे पत्र पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठवल्याचे खात्रीशीर वृत्त सोमेश्वर रिपोर्टरला सांगितले गेले आहे. 
       पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे मागील दोन महिन्यांपासून शासन आपल्या दारी कार्यक्रम होणार असल्याच्या तारीखा शासनाकडून कळविल्या जातात. शासकीय यंत्रणा जय्यत तयारी करतात नियोजन करत असते. पण वेगवेगळ्या कारणांनी तब्बल चार वेळा हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. आता पाचवी तारीख पुढे येत आहे. आता तरी शासन जेजुरीत येईल का याकडे पुरंदर सह पुणे जिल्ह्यातील लाभार्थ्यांचे डोळे लागले आहेत.
To Top