सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

खंडाळा ! बिलकीस पठाण-शेख ! तशा 'या' दोन गावातील महिला वर्षभर एकमेकांबरोबर प्रेमाने वागतात...पण आजच्या दिवशी या एकमेकांच्या 'दुश्मन' असतात ! खंडाळा तालुक्यातील सुखेड आणि बोरी गावाचा राज्यातील प्रसिद्ध बोरीचा बार

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोणंद :  प्रतिनिधी
संपूर्ण महाराष्ट्रात शिव्याशाप देण्याची अनोखी परंपरा असलेला बोरीचा बार यंदाही परंपरागत पद्धतीने मंगळवारी दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत खंडाळा तालुक्यातील सुखेड व बोरी दरम्यान वाहणाऱ्या ओढ्याच्या दोन्ही तीरावर मोठ्या उत्साहात पार पडला . दोन्ही गावांतील महिलांनी सनई हलगीच्या तालावर वाजत गाजत ओढ्यावर एकत्र येऊन एकमेकींवर शिव्यांचा भडिमार करत ही अनोखी परंपरा कायम ठेवली .
   
नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी पार पडणारा सुखेड व बोरी गावातील बोरीचा बार संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. या दिवशी दोन्ही गावांतील महिला एकत्र येऊन एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहतात. गावातील ओढ्यावर जमून दोन्ही बाजूकडील महिलांकडून एकमेकांना हातवारे करीत शिव्या दिल्या जातात.

बोरीचा बार सुरू होताना दोन्ही गावातील महिला एकत्र येऊन ओढ्यावर शिव्यांची लाखोली वाहत असतात, त्यावेळी पुरुष मंडळी ओढ्याच्या मध्यभागी उभे राहून दोन्ही महिलांना एकमेकींपासून लांब ओढण्याचा प्रयत्न करतात. श्रावणातल्या षष्ठीला हा बोरीचा बार साजरा होताना हलगी व सनईच्या सुरात महिलांना अधिकच चेव चढत होता. बार सुरू होण्यापूर्वी दोन्ही गावातील महिला ग्रामदैवताच्या मंदिरासमोर एकत्र आल्या. तेथून या महिला झिम्मा, फुगडी, फेर धरत ओढ्यापर्यंत गेल्या. यंदा ओढ्याला पाणी कमी असल्याने त्यांनी ओढ्याच्या काठावर उभे राहून पैलतीरावर असलेल्या महिलांवर शिव्यांचा भडीमार करीत बोरीचा बार साजरा केला. 
या वेळी लोणंद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशिल भोसले यांनी शांतता व सुव्यवस्थेसाठी महिला पोलिसांसह मोठा फौजफाटा तैनात केला होता. 
----------------
काय आहे प्रथा...
या बोरीच्या बार संदर्भात एक दंतकथा आहे. एक पाटील होते. त्यांना दोन बायका होत्या. पैकी एक सुखेड तर दुसरी बोरी या गावातील होत्या. त्या दररोज दोन्ही गावाची शिव असणाऱ्या ओढ्यावर धुणे धुण्यासाठी येत होत्या. ओढ्यावर दोघी एकत्र आल्यावर त्यांच्यात वाद होऊन दोघी एकमेकींना हातवारे करत शिव्या द्यायच्या. यावरून या बोरीचा बार अशी प्रथा असल्याचे ग्रामस्थ सांगतात. केवळ जिल्ह्यातूच नव्हे; तर इतर जिल्ह्यांतूनही हा बोरीचा बार पाहण्यासाठी दरवर्षी मोठी गर्दी होते .

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7307,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : खंडाळा ! बिलकीस पठाण-शेख ! तशा 'या' दोन गावातील महिला वर्षभर एकमेकांबरोबर प्रेमाने वागतात...पण आजच्या दिवशी या एकमेकांच्या 'दुश्मन' असतात ! खंडाळा तालुक्यातील सुखेड आणि बोरी गावाचा राज्यातील प्रसिद्ध बोरीचा बार
खंडाळा ! बिलकीस पठाण-शेख ! तशा 'या' दोन गावातील महिला वर्षभर एकमेकांबरोबर प्रेमाने वागतात...पण आजच्या दिवशी या एकमेकांच्या 'दुश्मन' असतात ! खंडाळा तालुक्यातील सुखेड आणि बोरी गावाचा राज्यातील प्रसिद्ध बोरीचा बार
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEh3_RF_IKipzP6PKhRz38DJSgdaemky4hzEMCN9PYvkDZDFbbDCyj-deorRDmCFHV_HYPfkfOlO6jgjOiteuu53SypD42VTc3WJxxkQ5wSlIl_skzEU3zPfsDuTkPUM6gYjRrdZtxf7CarXxrugQy60kt52Vzm6tVesZ-JF_RnHdqTWYhC5sJ7632XH-zoE
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEh3_RF_IKipzP6PKhRz38DJSgdaemky4hzEMCN9PYvkDZDFbbDCyj-deorRDmCFHV_HYPfkfOlO6jgjOiteuu53SypD42VTc3WJxxkQ5wSlIl_skzEU3zPfsDuTkPUM6gYjRrdZtxf7CarXxrugQy60kt52Vzm6tVesZ-JF_RnHdqTWYhC5sJ7632XH-zoE=s72-c
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2023/08/blog-post_541.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2023/08/blog-post_541.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy