पुरंदर ! निरा येथे धमाका गृपच्या वतीने मंगळागौर स्पर्धा : शेकडो महिलांच्या उपस्थित महिलांच्या समुहांचे आकर्षक सादरीकरण

Admin
2 minute read
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : विजय लकडे
निरा (ता.पुरंदर) शहरातील शंभरहून अधिक महिला सदस्य असलेल्या धमाका गृपच्या वतीने महिलांसाठी विविध गुणदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत. आज मंगळवारी या धमाका गृपच्या वतीने मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 
       श्रावणातील नागपंचमी हा महिलांचा सण म्हणून मानला जातो. नवीन लग्न झालेल्या नवविवाहिता पंचमीच्या सणानिमित्त माहेरी येत असतात. या काळात विविध खेळ, खेळत फेर धरले जातात. मोबाईलच्या युगात हे खेळ लुप्त पावत चालेल आहेत. या खेळांना नवसंजीवनी देण्यासाठी नीरेतील धमाका गृपच्या वतीने निरा परिसरातील महिलांच्या समुहांना कार्यक्रमात सहभागी होण्याचे आव्हान करण्यात आले होते. 
    निरेतील राधाकृष्णन मंगल कार्यालयात या मंगळागौर स्पर्धेचे आयोजन दुपारी दोन ते पाच वाजेच्या दरम्यान केले होते. कार्यक्रमाला शेकडो महिलांनी उपस्थित लावून स्पर्धेत ही सहभाग घेतला. उत्कृष्ट सादरीकरणाला स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
To Top