सोमेश्वर रिपोर्टर टीम------
शिरवळ : प्रतिनिधी
शिरवळ शहरालगत राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या गोकुळ लॉजवर पोलिसांकडून टाकण्यात आलेल्या छाप्यात वेश्याव्यवसाय केल्याप्रकरणी दोघेजणांना ताब्यात घेण्यात आलेले आहे.
सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, दोन इसमांनी राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वरील शिंदेवाडी ता. खंडाळा जि.सातारा गावाचे हद्दीतील गोकुळ लॉजवर वेश्यागमनाकरीता मुली ठेवल्या आहेत व ते मागणी केले प्रमाणे त्या ठिकाणी पुरुष ग्राहकांना मुली पुरवितात. त्याप्रमाणे त्यांनी पोलीस उपनिरीक्षक मदन फाळके यांचे पथकास प्राप्त बातमीचे ठिकाणी शिरवळ पोलीस ठाण्याच्या मदतीने जावून छापा टाकण्याचा आदेश दिला. पथकाने प्राप्त माहितीचे ठिकाणी जावून शिरवळ पोलीस ठाण्याकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने छापा टाकून वेश्यागमनाचा मोबदला स्वतःच्या उपजिविकेसाठी स्विकारुन, पिडीत महिलांना ग्राहकांसाठी वेश्यागमनासाठी उदयुक्त करुन, वेश्या व्यवसायाच्या कमाईतील मिळकतीवर अवलंबून राहून, वेश्या व्यवसायास प्रेरणा देणारा लाॅजचा मालक विनोद गोविंद अग्रवाल वय ५२ वर्षे रा धनगरवाडी शिरवळ ता खंडाळा जि सातारा व एक महिला आरोपी असे दोघांना ताब्यात घेतले व त्यांचे विरुध्द शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस निरीक्षक नवनाथ मदने शिरवळ पोलीस ठाणे, पोलीस उपनिरीक्षक मदन फाळके, पोलीस अंमलदार दिपक मोरे, अतिश घाडगे, राम गुरव, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, प्रविण फडतरे, लैलेश फडतरे, मोहन पवार, गणेश कापरे, पंकजा जाधव, मोनाली निकम, माधवी साळूंखे, क्रांती निकम, आदिका वीर, अनुराधा सणस, दलजित जगदाळे, शिरवळ पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक आंदेलवार, पोलीस अंमलदार जितेंद्र शिंदे, सचिन वीर, सचिन मोरे यांनी सदरची कारवाई केली आहे. कारवाई मधील सर्व अधिकारी व अंमलदार यांचे समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.