सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : संतोष म्हस्के
विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता तसेच परिस्थितीचा आणि परीक्षेचा भाऊ न करता मानसिक एकरूपता वाढवून एकाग्रतेने अभ्यास केल्यास यश निश्चित प्राप्त होते असे प्रतिपादन परीविक्षाधिन पोलीस उपाधीक्षक रेखा वाणी यांनी केले.
भोर शहरातील राजा रघुनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमांतर्गत मार्गदर्शन करताना गुरुवार दि .२४ रेखा वाणी बोलत होत्या.जीवनात यश मिळवायचं असेल तर कारणे देऊ नका.स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हायचं असेल तर सातत्य ठेवायला पाहिजे असाही सल्ला वाणी यांनी विद्यार्थ्यांना दिला.तर यावेळी पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया दुरंदे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी भोर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मधुकर पैठणकर ,डॉ. सुरेश गोरेगावकर,सचिव गजानन झगडे,भाजप ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गुरव,पंकज खुर्द,सीमा तनपुरे,सुरेश कांबळे,प्राचार्य संजय कडू ,उपप्राचार्य विष्णू अवघडे,पर्यवेक्षक सुरेश देशमाने,निलिमा मोरे,विक्रम शिंदे आदींसह शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी तसेच बहुसंख्येने उपस्थित होते.