सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वानेवाडी व सोमेश्वर कारखाना दरम्यान असणारा नीरा डाव्या कालव्यावरील नवीन पुलाच्या उभारणीसाठी हा रस्ता उद्या दि २६ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट दरम्यान बंद ठेवण्यात येणार असून वाणेवाडी, मुरूम, साखरवाडी, काळज या भागात जाणाऱ्या वाहनचालकांना पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागणार आहे.
बारामती सार्वजनिक बांधकाम विभागाने काढलेल्या आदेशात म्हणटले आहे की, करंजे देवालय सोमश्वर काराखाना वानेवाडी मुरुम (बारामती) रस्ता मुरुम (जिल्हा सातारा) ला मिळणारा जोडमार्ग प्रजिमा ६८ किमी. ९/७०० निरा डाव्या कालव्यावर वानेवाडी गावाजवळ लहान पुलाचे बांधकाम करणे या कामाचे कार्यारंभ आदेश मे. नोबेल कन्स्ट्रक्शन, पुणे यांना संदर्भ क्र.१ अन्वये देण्यात आलेले आहेत. या रस्त्यावरील सध्याचा असणाऱ्या पुलाची रुंदी कमी असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. यास्तव नवीन पुलाचे गर्डर शिफ्टींग करणेचे कामासाठी करंजेपुल ते वाणेवाडी रस्ता दि. २६/८/२०२३ ते दि. २८/८/२०२३ या कालावधीसाठी बंद करण्यात येणार आहे. सदरचा रस्ता बंद झाल्यामुळे नागरीकांनी इतर मार्गाचा वापर करणेबाबत रस्त्यावर सा.बां. विभागामार्फत बोर्ड लावण्यात येणार आहेत.
-----------------------
असा करा पर्यायी रस्त्याचा वापर------
वाणेवाडी व मुरूम कडून सोमेश्वर कारखान्याकडे जाणाऱ्या तसेच करंजेपुल व सोमेश्वर कारखान्याकडून मुरूम, वाणेवाडीकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी सोमेश्वर विद्यालय ते वाणेवाडी दरम्यानच्या मळशी पुलाचा वापर करावा. सदरचा लोखंडी पुलाची रुंदी कमी असल्याने हा पूल फक्त दुचाकी व छोट्या चारचाकी (कार) या वाहनांसाठी खुला राहील. या पुलावरून अवजड वाहनांना बंदी राहील. बारामती वरून मुरूम वाणेवाडी जाणाऱ्या वाहनचालकांनी होळमार्गे तर निरेवरून येणाऱ्या वाहनचालकांनी अक्षय गार्डन मार्गे-मळशी ते वानेवाडी अशा पर्यायी रस्त्याचा वापर करावा.