सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : प्रतिनिधी
ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल किकवी ता.भोर येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिं.२३ पार पडलेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेमध्ये १७ वर्षाखालील स्पर्धकांमध्ये जिजामाता इंग्लिश मीडियम विद्यालयातील इयत्ता आठवीतील कु.राजश्री निलेश पवार हिने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला.
राजश्री हिचे तालुक्यातून अभिनंदन होत आहे.
राजश्री पवार हिच्या यशामध्ये मुख्याध्यापिका श्रीम. रुबिना शेख,वर्गशिक्षिका श्रीम. सुप्रिया शिंदे, श्रीम.पूजा शेटे, थोपटे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन ठरले.