सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
तेजपृथ्वी ग्रुपच्या बारामती तालुका महिला अध्यक्षपदी सुनंदा रणवरे तर उपाध्यक्षपदी मालन निंबाळकर यांची निवड करण्यात आली आहे.
बारामती येथे तेजपृथ्वी ग्रूपच्या पदाधिकाऱ्यांच्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. सभा तेजपृथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अनिता नानासाहेब खरात यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सर्वानुमते बारामती तालुक्यात सामाजिक काम करणाऱ्या सुनंदा दादासो रणवरे यांची बारामती महिला तालुकाध्यक्ष तर उपाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्त्या मालन संतोष निंबाळकर निवड करण्यात आली.
बारामती तालुक्यात आम्ही वेळोवेळी सामाजिक कार्यात अग्रेसर असतोच पण आता मला तेजपृथ्वी ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांबरोबर सामाजिक कामात सक्रिय होता येईल. अशी प्रतिक्रिया निवडीनंतर रणवरे व निंबाळकर यांनी व्यक्त केली तसेच तेज पृथ्वी ग्रुपची ध्येय धोरणे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही नक्की करू अशी ग्वाही रणवरे यांनी दिली.
या निवडी वेळी तेजपृथ्वी ग्रुपचे उपाध्यक्ष गणेश शिंगाडे, इंदापूर तालुकाप्रमुख आर जे साबळे, तालुकाध्यक्ष राहुल नाकाडे, उपाध्यक्ष विजय पवार,सद्दामभाई बागवान बारामतीचे युवा नेते जगदीश कोळेकर व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.