सोमेश्वर रिपोर्टर टीम----
खंडाळा : मोहित देवधर
शासकीय विश्रामगृह खंडाळा येथे शिवसेना सातारा जिल्हा निरीक्षक पवन कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक महत्त्वाच्या विषयांवर महाबैठक आयोजित केली गेली.
खंडाळा, वाई, महाबळेश्वर, जावळी, सातारा, सर्व तालुक्यातून अनेक पदाधिकाऱ्यांनी अनेक प्रलंबित, सामाजिक असे विविध विषय घेऊन या बैठकीसाठी हजेरी लावली होती. यावेळी पक्ष निरीक्षक पवन कदम यांनी शिवसैनिक पदाधिकारी व माननीय मुख्यमंत्री यांच्यामधील दुवा म्हणून मी काम करणार आहे तसेच सातारा जिल्ह्यामधील अडीअडचणी माननीय मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी काम करेल अशी ग्वाही यावेळी कदम यांनी दिली. आगामी लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आदी स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवुन त्यादृष्टीने शिवसेनेने पुर्ण ताकतीने जोरदार तयारी सुरु केली असल्याचे ठिकठिकाणी सुरु असलेल्या कार्यकर्ता मेळाव्यातून स्पष्ट होत आहे.
राज्यातील सर्वच प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नेहमीच सकारात्मक प्रतिसाद दिला आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्व प्रलंबित प्रश्न, पाणी समस्या, औद्योगिक वातावरण प्रदुषित करण्याचे वाढत चाललेले प्रमाण, शेतीप्रश्न, कामगार अन्याय इत्यादी अनेक विषयांवर काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत विशेष बैठक वर्षा निवासस्थानी पार पडली असुन त्या अनुषंगाने पुढील तयारीसाठी आज खंडाळ्यात महाबैठक घेतल्याचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी स्पष्ट केले. संपूर्ण सातारा जिल्हा आणि वाई विधानसभेत संघटनवाढीसाठी शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात बीजपेरणी करण्यात आली असुन लवकरच येत्या निवडणुकीत शिवसेनेची वाढलेली ताकद विरोधकांना धक्का देणार असल्याचेही पुरुषोत्तम जाधव म्हणाले. या बैठकीवेळी रिएटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या कामगारांच्यावतीने संपाबाबत निवेदन देण्यात आले . सातारा जिल्हा शिवसेनेतर्फे नवनियुक्त पक्ष निरीक्षक पवन कदम यांचाही शाल, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला जिल्ह्यातून आलेल्या अनेक कार्यकर्त्यांच्या सर्वसमावेशक प्रश्नांवर चर्चा करून लवकरच सर्व प्रश्न निकाली लावले जाणार असल्याचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी स्पष्ट केले. शिवसेना पक्षाची संघटनात्मक मोर्चेबांधणीकरीता वरिष्ठांकडून मिळत असलेल्या ताकतीने सर्व शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य पसरल्याचे दिसून आले. या कार्यक्रमासाठी पक्षनिरीक्षक पवन कदम जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम वाई सहसंपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे महिला आघाडी प्रमुख शारदा जाधव विधानसभा प्रमुख विकास शिंदे, उपजिल्हाप्रमुख संदीप पवार उपजिल्हाप्रमुख प्रदीप माने वाई तालुकाप्रमुख रवींद्र भिलारे खंडाळा तालुकाप्रमुख भुषण शिंदे तसेच संपूर्ण युवासेनेचे पदाधिकारी, हितचिंतक व शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.