खंडाळा ! मोहित देवधर ! शिरवळ येथील कंपनीतील कर्मचाऱ्याचा आकस्मित मृत्यु : मृत कामगारास मदत मिळावी या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
खंडाळा : मोहित देवधर
दिं ७ रोजी शिरवळ येथील एका नामांकित कंपनीतील कर्मचाऱ्याचा आकस्मित मृत्यू झाल्याने कंपनी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 
          याबाबत  घटनास्थळ व शिरवळ पोलीस स्टेशनकडून मिळालेली अधिक माहिती अशी कि सुनिल मारुती भिसे     ( वय३८, रा. पळशी) हे कर्मचारी कंपनीत गेले असता अचानक त्रास होऊ  लागल्याने कंपनीच्या वाहनाने दवाखान्यात आणण्यात आले मात्र डॉक्टर नसल्याने त्यांना त्यांच्या राहत्या घरी सोडले मात्र त्यानंतर त्रास जास्त झाल्याने त्यांना ग्रामस्थांनी उपचारासाठी शिरवळ येथे आणले असता उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. परंतु घडलेल्या प्रकारानंतर पळशी ग्रामस्थ व मृताचे नातेवाईक यांनी कंपनी परिसरामध्ये एकत्र येत मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना मदत मिळावी यासाठी गर्दी केले होती. मात्र पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. घटनास्थळी शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने, पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई, अब्दुल हादी बिद्री व कर्मचारी तात्काळ हजर झाल्याने शांततेत परिस्थिती हाताळली गेल्याने अनर्थ टळला.
To Top