सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा : ओंकार साखरे
पत्रकार बांधवांवर वारंवार होत असणाऱ्या मारहाणीच्या घटना यावर आज जावळी तालुका पत्रकार संघटनेतर्फे नुकताच चर्चेत असलेला विषय पत्रकार महाजन यांना मारहाण झाल्या प्रकरणी आज मेढा तहसीलदार कार्यालयाबाहेर निषेध करत व पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने आज जावली तालुका पत्रकार संघटनेच्या एकीने आज सर्वानुमती त्या कायद्याची होळी तहसीलदार कार्यालयाबाहेर करण्यात आली .
पत्रकार हा एक लोकप्रतिनिधींचे कार्य करत असतो जनतेच्या मागण्या व जनतेचे प्रश्न सर्वांसमोर मांडण्याचे काम करत असतो आणि हे करत असताना पत्रकार बांधवांना धमक्या कुठे मारहाण होत असते तरीही वारंवार त्यांच्यावर मारहाणीच्या घटना होतच असतात या होत असलेल्या मारहाणीच्या घटना कुठेही कमी होताना दिसत नाही आणि पत्रकार विरोधी कायद्याची कुठेही अंमलबजावणी होत नसताना दिसत आहे .
या होणाऱ्या घटना कधी बंद होणार आणि पत्रकार बांधव कधी सुरक्षित राहणार अशी मागणी सर्व पत्रकार संघटनेमार्फत व्यक्त केली जात आहे .