सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
श्रीक्षेत्र सोमेश्वर देवस्थान करंजे ता. बारामती येथे श्रावणी यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांसाठी चालू वर्षी सशुल्क पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या चार वर्षांपासूनची मोफत पार्किंग व्यवस्था बंद करत पार्किंगसाठी प्रथमच थेट लिलाव पद्धतीने बोली लावण्यात आली.
अनेक तरुणांनी यात उस्फुर्त सहभाग घेतला. गुरुवार दि.१७ रोजी विविध प्रमुख पदाधिकारी, विश्वस्त समिती, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत मोटार सायकल, चार चाकी वाहने, बस यासाठी लिलाव प्रक्रिया पार पडली. उद्योजक हनुमंत मगर यांनी २ लाख ६५ हजार आणि संतोष हाके यांनी २ लाख ६६ हजार रुपये बोली लावत लिलाव घेतला. यामूळे देवस्थान विकास कामाला गती मिळणार आहे. यावेळी जेष्ठ व पदाधिकारी यांनी चर्चेतून विश्वस्त मंङळाला काही सुचना केल्या. देवस्थानचा विकास आराखडा मंजूर यातून पर्यटनाला चालना मिळेल.
यावेळी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप, संचालक संग्राम सोरटे, आप्पासाहेब गायकवाड, निवृत्ती शेंडकर, राजकुमार धुर्वे, शिवाजी शेंङकर, भाऊसाहेब हूंबरे, सोमेश्वर देवस्थानचे अध्यक्ष प्रताप भांङवलकर, सचिव संतोष भांडवलकर उपस्थित होते. सोमेश्वर देवस्थानने यात्रेनिमित्त सुसज्ज पार्किंग व्यवस्था केली असून तहसीलदार गणेश शिंदे यांचे याकामी सहकार्य लाभले. यात्रा काळात भाविकांना वाहन पार्किंग करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी सर्वांनी सहकार्य केले. पार्किंग परीसरासाठी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, उद्योजक संतोष कोंढाळकर, बाळासाहेब शिंदे, आगम तलाठी यांनी सहकार्य केले. निधीचा वापर परीसर स्वच्छता, वृक्षारोपण, सुशोभीकरण आणि भाविकांना सोयेसुविधा यासाठी होणार आहे.