बारामती ! 'सोमेश्वर'च्या विक्रमी ऊसदरानंतर आता 'माळेगाव'कडे नजरा : माळेगावला स्वतःचाच ३४०० चा विक्रम मोडण्याची संधी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : महेश जगताप
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने सन २०२२-२३ मधील गाळप हंगामात तुटून आलेल्या उसाला प्रतिटन तब्बल ३ हजार ३५० रुपये  ऊसदर जाहीर करत राज्यातील ऊसदराची कोंडी फोडली, त्यामुळे आता शेजारील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ऊस दराकडे ऊस उत्पादकांचे लक्ष लागून राहिले आहे.
         यामध्ये सोमेश्वर पेक्षा अधिकचा ऊस दर मिळणार का?  याबाबत ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कमालीची उत्सुकता असल्याचे दिसते.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पुणे येथील  कार्यक्रमांमध्ये बारामती तालुक्यातील एक सहकारी साखर कारखाना मागील गाळप हंगामात गाळप झालेल्या उसास प्रति टन ३ हजार ३५० रुपये ऊस दर देऊ शकेल असे सुतोवाच केले होते.त्याच आधारावरती सोमेश्वर साखर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने तातडीने बैठक घेत ऊसाला तब्बल प्रति टन ३ हजार ३५०  रुपये ऊसदर जाहीर केला.
      आता सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने जाहीर केलेला ऊस दर पाहता माळेगाव सहकारी साखर कारखान्यांच्या ऊस उत्पादक सभासदांमध्ये ऊस दरा बद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान माळेगाव साखर कारखान्याने मागील गाळप हनगामात तुटून आलेल्या उसाच्या एफ आर पी पोटी २ हजार ८५१  दिले आहेत.तर कांडेबिलापोटी प्रति टन १०० रुपये दिले आहेत,असे एकूण आज पर्यंत ऊस उत्पादक  शेतकरी सभासदांना प्रति टन २ हजार ९५१ रुपये मिळाले आहेत.
 राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अधिपत्याखालील या दोन्ही सहकारी साखर कारखान्यांमध्ये मागील काही गाळप हंगामाचा विचार करता सातत्याने ऊस दाराबाबत चुरस असल्याचे दिसते. आता मात्र सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने ऊस दराची कोंडी फोडत ३ हजार ३५० रुपये प्रति टन ऊस दर जाहीर केला आहे.त्यामुळे माळेगाव साखर कारखान्याचे सत्ताधारी संचालक मंडळ ऊस उत्पादक शेतकरी सभासदांना सोमेश्वर पेक्षा अधिकचा दर देतील अशी अपेक्षा माळेगाव चे ऊस उत्पादक शेतकरी सभासद व्यक्त करताना दिसत आहेत.
-------------------   
माळेगाव चा ३४०० रुपयांचा विक्रम मोडण्याची संधी
गाळप हंगाम सन २०१८-१९ मध्ये चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांच्या विचारांचे संचालक मंडळ असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उच्चंकी असा ३ हजार ४०० रुपये प्रति टन ऊस दर दिला होता.आता माळेगाव साखर कारखान्याच्या इतिहासातील या उच्चंकी ऊस दराचे रेकॉर्ड मोडण्याची संधी सत्ताधारी संचालक मंडळाला असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत.
To Top