जावली तालुका पत्रकार संघ व डिजिटल मिडिया मेढा यांच्या वतीने मेढ्यात पत्रकार संरक्षण कायद्याची होळी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा : ओंकार साखरे
जावली तालुका पत्रकार संघ  व डिजिटल इलेक्ट्रिक मिडिया यांच्या वतीने मेढ्यात पत्रकार संदिप महाजन यांना करण्यात आलेल्या अर्वाच्य शिवीगाळ व मारहाणीचा निषेध म्हणून तहसिल कार्यालया समोर पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करण्यात आली.
        पत्रकार महाजन यांना आमदार किशोर पाटील यांच्या मार्फत अर्वाच्य शिवीगाळ होऊन मारहाण करण्यात आली. ज्यांनी पत्रकाराला मारहाण केली त्याच्यावर कडक कारवाई करावी. पत्रकार संरक्षण कायद्याची  कडक अंमलबजावणी होत नाही याचा निषेध म्हणून पत्रकारांनी जावली तालुका महसूल विभाग यांना निषेधाचे निवेदन दिले. त्यावेळी जावली तालुका पत्रकार संघांचे अध्यक्ष प्रशांत गुजर, भास्कर धनावडे, सचिव धनंजय गोरे, जेष्ठ  पत्रकार नारायन शिंगटे, सातारा जिल्हा सचिव सोमनाथ साखरे, मोहन जगताप,विजय सपकाळ, सुरेश पार्टे,संजय दळवी, रघुनाथ पार्टे, युवराज धुमाळ,अभिजित शिगटे, बजरंग चौधरी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
              यावेळी पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कारवाई न झाल्यास तिव्र अंदोलने उभारण्यात येतील असा निर्धार उपस्थित पत्रकारांनी व्यक्त केला. पत्रकार कायदा अधिक कडक करा अशा प्रकारच्या घोषणा करण्यात आल्या. प्रसंगी जाहीर निषेध करत पत्रकार सरक्षक कायद्याच्या प्रतीची होळी करण्यात आली.
To Top