Bhor News ! संतोष म्हस्के ! कोळेवाडीत बिबट्याचा गोठ्यात शिरून शेळ्यांवर हल्ला : घटनेने भोर तालुक्यातील नागरिक भयभीत

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील कोळेवाडी ता.भोर (आंबाडे) येथील प्रकाश रघुनाथ कांबळे यांच्या शेळ्यांच्या गोठ्यात रात्री १२ च्या सुमारास बिबट्याने लाकडी कुड तोडून गोठ्यात शिरून हल्ला चढविला. मात्र कुत्र्यांच्या आरड्या -ओरड्याने बिबट्याने डोंगर भागाकडे धूम ठोकल्याने गोट्यातील १० शेळ्या बालमबाल बचावल्या.
     कोळेवाडी गाव आंबाडखिंड घाटाच्या पायथ्याला वसलेले असून परिसर जंगलमय असल्याने वन्य हिंस्र  प्राण्यांचा वावर परिसरात मोठ्या प्रमाणावर असतो. गुरुवार दि.१७ रात्रीच्या वेळी बिबट्याने प्रकाश कांबळे यांच्या शेळ्यांच्या गोठ्यात मागील बाजूने प्रवेश केला व शेळ्यांवर हल्ला केला.मात्र दहा ते पंधरा कुत्र्यांनी मोठा आरडाओरडा केल्याने नागरिक जागे झाले. काही क्षणातच बिबट्याने घटनास्थळावरून धूम ठोकली.बिबट्या डोंगर भागाकडे पळून जाताना सुरेश भगवान रांजणे ,ज्योती सुरेश रांजणे समक्ष पहावयास मिळाला.यावेळी स्वप्निल रांजणे,पोलीस पाटील संदीप आबाजी रांजणे यांनी गावातील ग्रामस्थांना जमा करून झालेल्या घटनेची माहिती दिली.नागरिकांनी बिबट्या सदृश्य प्राणी का बिबट्याच होता याची पायांच्या ठशावरून खात्री केली असता बिबट्याच्याच पायाचे ठसे आढळून आले.कुत्र्यांच्या सावधगिरीने दहा शेळ्या बसवले असून लाखो रुपयांचे नुकसान टळले आहे असे प्रकाश रघुनाथ कांबळे यांनी सांगितले.
To Top